bharat jadhav shared post about his movie bakula namdev ghotale complete 15 years sakal
मनोरंजन

Bharat Jadhav: घोटाळे सुटायला पाहिजे गड्या.. भरत जाधवची ही पोस्ट वाचच..

पंधरा वर्षांपूर्वीची एक आठवण सांगत भरत म्हणाला भकासपूर वाट पाहतंय..

नीलेश अडसूळ

Bharat jadhav: नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वातील नाना माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. तो सोशल मीडियावर सक्रिय असला तरी भारंभर पोस्ट टाकण्याऐवजी महत्वाच्या आणि लक्षवेधी पोस्ट तो टाकत असतो. भरतने आजवर त्यांच्या अकाऊंटवरुन कायमच महत्वपूर्ण विषयवार भाष्य केले आहे. कधी मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणी, रंजक किस्से तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर कधी एखादे निमित्त साधून आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी भरभरून लिहितो. आज मात्र त्याने थेट 'घोटाळे' या विषयाला हात घातला आहे. बघूया नेमकं काय म्हणालाय भरत जाधव..

घोटाळे सुटायला पाहिजे गड्या.. असं म्हणत भरत जाधवने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहेत. पण भरत आज कोणत्याही राजकीय घोटाळ्या विषयी नाही तर त्याच्या चित्रपटातील घोटाळ्याविषयी बोलत आहे. अर्थात विषय तुम्हाला समजलाच असेल. तो म्हणजे भरतचा एव्हरग्रीन सिनेमा 'बकुळा नामदेव घोटाळे'. काल 12 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भरतने एक पोस्ट लिहिली आहे.

bharat jadhav as sarpanch ghotale in bakula namdev ghotale movie

2007 मध्ये 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाने मराठी मनोरंजन विश्वात अक्षरशः धुमाकूळ घातला. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत होते. फुल्ल टू विनोदी अशा या चित्रपटात भरतने 'सरपंच घोटाळे' हे पात्र साकारले होते. त्याचे हे पात्र, त्याचा लुक, संवाद सगळच प्रेक्षकांना भावलं. वेंधळा नामदेव, खमकी पण देखणी बकुळा आणि तिच्यामागे हात धुवून लागलेला सरपंच घोटाळे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन कसलीही कसर सोडली नाही. या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली असून भरत त्यावर व्यक्त झाला आहे.

भरत म्हणतो, '१५ वर्षांपूर्वी जेंव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा घोटाळे च्या लुकवर काही प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं की नंतर या पात्राला इतकं अमाप प्रेम मिळेल. युट्यूब वर कमेंट्स मध्ये घोटाळे या पात्रासाठी लोकं भरभरून कमेंट करतात , घोटाळेच्या तोंडी असलेले इरसाल संवाद अजूनही लोकं तितकंच एन्जॉय करतात याचं कलाकार म्हणून विलक्षण समाधान वाटतं...!! या यशाचं सार श्रेय संपूर्ण टीमच आणि लेखक दिग्दर्शक केदार शिंदेंच. १५ वर्ष झाली.... आता घोटाळे सुटायला पाहिजे गड्या...भकासपूर वाट पाहतोय..!!!' अशी पोस्ट त्याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT