Bharat Vs India PM Narendra Modi Party Social  esakal
मनोरंजन

Bharat Vs India Memes : 'इंडिया'चे नामकरण 'भारत' झाल्यास कुणाची नावं कशी असतील? नेटकऱ्यांच्या 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाय!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणूकीत पराभूत करण्यासाठी देशातील वीसहून अधिक पक्षांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

युगंधर ताजणे

Bharat Vs India PM Narendra Modi Party Social : देशामध्ये सध्या एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकजूट करत आपला वेगळी आघाडी उभारणाऱ्या इंडियाची चांगलीच धास्ती सत्ताधारी पक्षानं घेतल्याचे दिसून आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणूकीत पराभूत करण्यासाठी देशातील वीसहून अधिक पक्षांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.त्यात कॉग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधीपासून वेगेवगळ्या राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश या आघाडीमध्ये करण्यात आला आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर मात्र वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

यापुढील काळामध्ये इंडिया नव्हे तर भारत असे नाव सर्वच ठिकाणी असेल अशी भूमिका पीएमओ कार्यालयाकडून घेण्यात आल्याचे कळते आहे. जी २० बैठकीसाठी देखील भारतानं जेव्हा वेगवेगळ्या देशांना निमंत्रण पाठविण्यास सुरुवात केली त्याच्या पत्रिकेवर देखील इंडिया असा उल्लेख नसून तो भारत असा केला गेला आहे. याशिवाय सोशल मीडियावरील मीम्स देखील भन्नाट आहेत.

नेटकऱ्यांनी ज्या क्रिएटिव्हीटीनं मीम्स तयार केले आहेत त्याला तोड नाही. आता तर माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं देखील इंडिया हा नामोल्लेख काढून तो भारत असा करावा असे म्हटले आहे. बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील भारत माता की जय असे ट्विट केले आहे. यामुळे येत्या काळात इंडिया विरुद्ध भारत असा संघर्ष दिसून येणार आहे. त्याची सुरुवात काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

यापूर्वी साऊथ आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू जाँटी ऱ्होडसची मुलगी आणि अॅव्हेजर्समधील कलाकार ख्रिस हेम्सवर्थची मुलगी या दोघींची नावं देखील इंडिया असल्यानं त्या देखील सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील भारत नावाचा चित्रपट तयार करणार आहे. याशिवाय एसबीआय या भारतातील सर्वात मोठ्या बँकेचे नामकरण देखील स्टेट बँक ऑफ भारत असे होणार आहे. अशा प्रकारचे मीम्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT