bharti sing says 'bai g..' sakal
मनोरंजन

भारती सिंगला 'चंद्रमुखी'ची भुरळ.. म्हणाली, 'बाई गं..'

कॉमेडियन भारती सिंग हिने 'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटासाठी एक खास व्हिडीओ तयार केला आहे.

नीलेश अडसूळ

Chandramukhi : विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेला, प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपट अवघ्या काही दिवसातच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्यांची भुरळ अनेकांना पडली आहे. 'चंद्रा', 'बाई गं' या दोन लावण्या प्रसिद्ध झाल्या असून या गाण्यांवर थिरकण्यात चाहते दंग झाले आहेत. या चित्रपटाचे तिसरे गाणे म्हणजे सवाल जवाबची लावणीही नुकतीच प्रदर्शित झाली. बऱ्याच दिवसांनी अशी लावणी पाहून चाहते खुश झाले आहेत. या चित्रपटाची हवा सर्वत्र असताना कॉमेडियन भारती सिंगलाही (bharti singh) राहवले नाही. तिनेही 'बाई गं..' म्हणत 'चंद्रमुखी'चे कौतुक केले आहे.

तमाशातील लावण्यवती चंद्रा आणि राजकारणी दौलत देशमाने यांच्या नात्याची ही गोष्ट आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) हिने चंद्राची तर अभिनेता आदिनाथ कोठारे (adinath kothare) याने दौलत देशमाने हे पात्र साकारले आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल यांनी दिले असून संगीत हा या चित्रपटाचा आत्मा असे म्हणायला हरकत नाही. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन आशिष पाटील याने केले आहे. उत्कृष्ट संगीत आणि नृत्य यामुळेच 'चंद्रा' आणि 'बाई गं' या गाण्यावर चाहते थिरकत आहेत. कॉमेडियन भारती सिंगनेही (bharti singh) एक व्हिडीओ तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओ मध्ये भारती सिंगने चंद्रमुखी चित्रपटाचे तसेच लावणी दिग्दर्शक आशिष पाटील याचे खास कौतुक केले आहे. “मला फार आनंद होत आहे की माझा मित्र आणि लावणी किंग आशिष पाटील याचे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याची खूप इच्छा होती की एखाद्या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन करावं. त्याच्या आवडत्या संगीत दिग्दर्शकांनी म्हणजे अजय अतुल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या चित्रपटाचे नाव 'चंद्रमुखी असून तुम्ही सर्वांनी 'बाई गं' ही लावणी आवर्जून बघा,' असे भारतीने म्हंटले आहे. या व्हिडिओवर 'चंद्रमुखी'च्या टीमनेही भारतीचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT