Bharti Singh Trolled For Placing Hookah In Son’s Photoshoot, Netizens Remanded Them!! Instagram
मनोरंजन

Bharti Singh च्या बाळाचा नवा फोटो नेटकऱ्यांना खटकला;म्हणाले,'हे योग्य नाही'

कॉमेडियन भारती सिंगनं काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचा लक्ष्य उर्फ गोलाचा चेहरा दाखवला होता.

प्रणाली मोरे

कॉमेडियन भारती सिंगनं(Bharti Singh) काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचा लक्ष्य उर्फ गोलाचा चेहरा दाखवला होता. भारतीने आपल्या युट्यूब चॅनेलवर गोलाची पहिली झलक शेअर केली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरी उत्सुकता स्पष्ट दिसत होती. यानंतर भारतीने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या लाडक्या मुलाचे काही फोटो शेअर केले. पण यावेळी नेटकऱ्यांनी भारतीच्या फोटोपोस्टची प्रशंसा करतानाच काहींनी टीका देखील केल्याचं निदर्शनास आले आहे.(Bharti Singh Trolled For Placing Hookah In Son’s Photoshoot, Netizens Remanded Them!!)

भारती सिंगने मुलाचे काही नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये लक्ष्य म्हणजेच गोला अरबी लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावर एक कॉटर्न स्कार्फ बांधलेला दिसत आहे. गोला डोळे बंद करून खुर्चीवर बसला आहे. त्याच्या चारही बाजूंना पांढराशुभ्र फर दिसत आहे. लक्ष्यच्या समोर इफेक्टसाठी हुक्का देखील ठेवण्यात आला आहे.

गोलाच्या या फोटोंची मनोरंजन वर्तुळातील भारतीचे निकटवर्तीय आणि सोबत चाहतेही प्रशंसा करताना दिसत आहेत. पण काहींनी फोटोतील हु्क्कावर मात्र आक्षेप नोंदवला आहे. काही जणांनी भारतीच्या या बाळाची तुलना करिनाच्या तैमूरशी देखील केली आहे.

एका नेटकऱ्यानं हुक्क्याप्रती नाराजगी दर्शवत म्हटलं आहे की,' बाकी सर्व ठीक आहे पण हुक्का कुठल्या खुशीत?' तर एका दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं आहे की,'आतापासूनच मुलांना बिघडवत आहात'. तर आणखी एकानं लिहिलंय,'बाळाजवळ हुक्का का ठेवला आहे?' एकाने लिहिलंय, 'बाळ खूपच क्यूट आहे. पण ही थीम बाळाच्या आरोग्यासाठी घातक आहे. सॉरी,पण हे काही चांगलं नाही'.

एका भारतीच्या चाहत्यानं तर बाळाचं नवीन नामकरण करीत नाव ठेवलं-गोला हबीबी सिंग लिंबाचिया. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांना ३ एप्रिल,२०२२ रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. आणि जवळ-जवळ ३ महिन्यानंतर ११ जुलै रोजी भारतीने आपल्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला. भारती आणि हर्ष आपल्या मुलाचे फोटोशूट करुन खूप सुंदर फोटो शेअर करताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT