bhau kadam and ashok saraf viral video that bhau kadam blessing from ashok saraf  SAKAL
मनोरंजन

Bhau Kadam - Ashok Saraf: भाऊ कदमने अशोक मामांच्या पायावर घातलं लोटांगण! व्हिडिओला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद

अशोक सराफ आणि भाऊ कदम यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

अशोक सराफ यांची वेगळी ओळख मराठी माणसांना सांगायला नको. अशोक सराफ यांनी आजवर विविध सिनेमा, मालिकांमधून स्वतःचं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं.

आजही अशोक सराफ यांचे विविध सिनेमे हसून हसून डोळ्यातून पाणी आणतात. मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार अशोक सराफ यांना मानाचं स्थान देतात.

अशीच एक गोष्ट नुकतीच बघायला मिळाली. जेव्हा चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली. तेव्हा काय झालं तुम्हीच बघा.

(bhau kadam and ashok saraf viral video that bhau kadam blessing from ashok saraf)

भाऊ कदम यांनी अशोक मामांची भेट

भाऊ कदम यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत दिसतं की अशोक सराफ दार उघडतात. तिथे अशोक सराफ मोबाईल घेऊन सोफ्यावर बसले असतात.

भाऊ गेल्या गेल्या अशोक मामांच्या पाया पडतो. पुढे अशोक मामा आणि भाऊमध्ये घडतो एक प्रेमळ संवाद.

अशोक सराफ भाऊ कदमला विचारतात, "अरे भाऊ. इकडे कसा काय? तू इकडेच राहतोस ना? बाकी कसा आहेस? तुझा शो काहीतरी सोमवार - मंगळवार येतो ना?"

भाऊने अशोक मामांच्या पायावर घातलं लोटांगण

हा व्हिडीओमध्ये आणखी एक गोष्ट दिसते जेव्हा अशोक सराफ यांना भाऊ आदराने आणि प्रेमाने नमस्कार करताना दिसतो. आपल्या लाडक्या महानायकाला भाऊने केलेला हा नमस्कार असतो.

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय. अनेकांना अशोक सराफ यांना पाहताच लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण आलीय. याशिवाय अनेकांनी भाऊच्या कृतीचं कौतुक केलीय.

एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दोन विनोदाचे महानायक यानिमित्ताने एकत्र आलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT