bhau shinde marathi movie raundal will release in hindi soon know about box office collection
bhau shinde marathi movie raundal will release in hindi soon know about box office collection sakal
मनोरंजन

Raundal: 'रौंदळ'ला तूफान प्रतिसाद.. कोट्यावधींच्या कमाईनंतर करत आता हिंदीत होणार रिलीज..

नीलेश अडसूळ

Raundal: मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनत असतात. त्यातील काही विषय असे असतात की ते मनाला चांगलेच भिडतात. प्रेक्षक अशा विषयांवरील चित्रपटांचे चांगले स्वागत करतात.

रौंदळ हा मराठी चित्रपट त्याच पठडीत बसणारा आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा कमी भाव, त्यातच ठेकेदारांचा मनमानी कारभार, त्यांना असलेला राजकीय आश्रय. त्यामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल होतो. अपार कष्ट आणि मेहनत घेऊनदेखील त्याच्या वाट्याला दुःख आणि गरिबीच येते. मग अशा वेळी एखादा रांगडा तरुण त्याविरोधात आवाज उठवितो. रौंदळ हा मराठी चित्रपट याच कथानकाभोवती फिरणारा आहे.

या चांगल्या कथानकाला प्रेक्षकांची जबरदस्त साथ मिळते आहे. कोणताही मोठा चेहरा नसताना ह्या चित्रपटाने काही दिवसातच कोट्यवधींचा गल्ला पार केला आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

(bhau shinde marathi movie raundal will release in hindi soon know about box office collection)

शहरी सोबत ग्रामीण भागातील प्रेक्षकांना 'रौंदळ'ची विशेष भुरळ पडली आहे. या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या तीन दिवसात 5 कोटींहून अधिक कमाई केली आहे. एकूण 320 सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला 'रौंदळ' 890 शोजसह प्रचंड गर्दीत सुरू आहे.

आता बॉक्स ऑफिसवरील या सकारात्मक प्रतिसाद पाहून हा चित्रपट लवकरच हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं निर्मात्यांनी घोषित केलं आहे. 'चित्रपटाचं कथानक रसिकांना आपलसं करत असून, कलाकारांचा अभिनय मनाला भावत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे इतर प्रेक्षकांची पावलंही 'रौंदळ' पाहण्यासाठी सिनेमागृहाच्या दिशेनं वळत आहेत, असेही ते म्हणाले.

'रौंदळ'मधील गाणी खऱ्या अर्थानं मराठी संगीतरसिकांसोबतच अमराठी संगीतप्रेमींच्या मनातही रुंजी घालू लागली आहेत. संगीतकार हर्षित अभिराज यांचे संगीत लाभलेल्या 'मन बहरलं...', 'ढगानं आभाळ...' या गाण्यासोबतच 'भलरी...' हे शेतीवरील गाणं महाराष्ट्रातील तमाम संगीतप्रेमींनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.

जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या संगीतप्रधान संघर्षमय लव्हस्टोरी असणाऱ्या 'रौंदळ' या चित्रपटाचं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे.

भाऊसाहेब शिंदेच्या दमदार एंट्रीला टाळ्या-शिट्टयांचा वर्षाव होत आहे. भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे या नव्या कोऱ्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे या कलाकारांनी 'रौंदळ'मध्ये अभिनय केला आहे. वास्तवदर्शी वाटणारी अॅक्शन दृश्ये लक्ष वेधून घेत आहेत. या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक विक्रमसेन चव्हाण आहेत, तर कार्यकारी निर्माते मंगेश भिमराज जोंधळे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT