Bhavatharini Singer daughter of musician Ilayaraja passed away  esakal
मनोरंजन

Bhavatharini Passed Away : प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांची मुलगी गायिका भवतारिनी यांचे निधन, ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

दाक्षिणात्य संगीत विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांची मुलगी लोकप्रिय गायिका भवतारिनी यांचे निधन झाले आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Bhavatharini Singer daughter of musician Ilayaraja passed away : दाक्षिणात्य संगीत विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांची मुलगी लोकप्रिय गायिका भवतारिनी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४० व्या त्यांनी श्रीलंकेत अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तसेच संगीत विश्वातील वेगवेगळे पुरस्कार प्राप्त भवतारिनी यांचा चाहतावर्ग मोठा होता. त्यांच्या जाण्यानं दाक्षिणात्य संगीत विश्वाची मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया विविध सेलिब्रेटींनी दिल्या आहेत. एका दुर्धर आजाराचा सामना करत असताना भवतारिनी यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगण्यात आले आहे. द हिंदून याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, तेलंगाणाचे राज्यपाल तमिळसाई सौंदररान याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भवतारिनी यांना आदरांजली वाहिली आहे. एम के स्टॅलिन यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भवतारिनी या लोकप्रिय गायिका होत्या. त्यांना भारथी नावाच्या चित्रपटातील गाण्यांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय कवी सुब्रमण्य भारथी यांच्यावर आधारित तो बायोपिक होता.

भवतारिनी यांनी त्यांच्या गायकीनं चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्यानं संगीत विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी ही कधीही भरुन येणार नाही. अशी भावना सौंदरराजन यांनी व्यक्त केली आहे.

याबरोबरच साऊथमधील अनेक अभिनेते, संगीत क्षेत्रातील कलावंत यांनी इलायराजा यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. संगीतकार युवान शंकर, कार्तिक राजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भवतारिनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Wari Accident: जेजुरी अपघातानंतर आरोग्य विभागाची युद्धपातळीवर धाव; मृत वारकऱ्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचवण्याची शासनाची व्यवस्था

Latest Marathi News Live Update : जून २०२६ मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर ४.३८% आहे

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT