Bhavna Chauhan,Ranveer Singh 
मनोरंजन

Bhavna Chauhan: 'मी चुकून जॉन सीना वाचलंं अन् होकार दिला..'; जॉनी सिन्ससोबतच्या जाहिरातीबाबत अभिनेत्रीने सोडलं मौन

Bhavna Chauhan: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भावनानं सांगितलं की, तिला कल्पना नव्हती की, ती जॉनी सिन्ससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्याऐवजी, तिला वाटले की ती जॉन सीनासोबत काम करणार आहे.

priyanka kulkarni

Bhavna Chauhan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि पॉर्नस्टार जॉनी सिन्स ( Johnny Sins) यांच्या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या  बोल्ड जाहिरातीत अभिनेत्री भावना चौहान (Bhavna Chauhan) हिने देखील काम केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भावनानं सांगितलं की, तिला कल्पना नव्हती की, ती जॉनी सिन्ससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्याऐवजी, तिला वाटले की ती जॉन सीनासोबत काम करणार आहे.

काय म्हणाली भावना?

भावनानं मुलाखतीमध्ये सांगितलं, "मी नाव चुकीचे वाचले होते. मी जॉनी सीन्सच्या ऐवजी जॉन सीना असं वाचलं. मी नाव चुकीचे का वाचले ते मला माहित नाही पण मी याचा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता की जॉनी अशा जाहिरातीचा भाग असेल. मला वाटले की भारतात रेसलर खूप काम करतात आणि म्हणून मी मूर्खपणाने विचार करत होतो की, तो जॉन सीना असेल. मला जेव्हा फायनल डिटेल्स मिळाले तेव्हा मला कळालं की, ते जॉनी सिन्स होते."

जॉनी सिन्ससोबत काम करताना कसा आला अनुभव? भावना म्हणाली...

जॉनी सिन्ससोबत काम करताना कसा अनुभव आला? याबद्दल देखील भावनानं मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, “त्याच्यासोबत काम करुन खूप मजा आली. आमची एनर्जी खूप जुळली आणि त्याने मला सांगितले की त्याला माझे काम आवडले"

कोण आहे भावना चौहान?

भावना चौहान ही अभिनेत्री आहे. तिनं रझिया सुलतान (२०१५) या टीव्ही शोमध्ये काम केलं. तसेच तिनं शिकारा (२०२०) आणि हसी तो फसी (२०१४) या चित्रपटांमध्ये देखील काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT