bheed movie box office collection day1 cast rajkummar rao bhumi pednekar sakal
मनोरंजन

Bheed Box Office Collection: करोनाचा विषय फसला! राजकुमार रावचा 'भीड' बॉक्स ऑफिसवर आपटला..

कोरोनाकाळावर आधारित असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

नीलेश अडसूळ

Bheed Box Office Collection: गेली काही दिवस भीड या चित्रपटाची बरीच चर्चा होती. करोनाकाळावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत आहेत तर अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

अनुभव सिन्हा यांनी कायमच बॉलीवुडला वेगळे विषय आणि दमदार चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटकाडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. हा चित्रपट हिट ठरेल असेही बोलले जात होते. पण तसे बॉक्स ऑफिसवर मात्र दिसले नाही.

सध्या बॉलीवुडमध्ये सुरू असलेला 'करोना'वर चित्रपट करण्याचा ट्रेंड इथे सपशेल फसलेला दिसतो. कारण हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात अपयशी ठरला आहे.

(bheed movie box office collection day1 cast rajkummar rao bhumi pednekar)

कोरोनाकाळावर आधारित असलेला 'भीड' हा चित्रपट ब्लॅक अॅन्ड व्हाईट थीमवर आधारित आहे. या चित्रपटाविषयी समीक्षकांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर सोशल मीडियावरही या चित्रपटाबाबत बरेच सकारात्मक वातावरण दिसले. पण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही.

हा चित्रपट काल शुक्रवार 24 मार्च रोजी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं केवळ 15 लाख रुपयांची कमाई केली. बॉलीवुडच्या अनुषंगाने ही कमाई अत्यंत कमी आहे. त्यामुळे आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

भीड या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर  यांच्यासोबतच कज कपूर, आशुतोष राणा, दिया मिर्झा, संजय मिश्रा, कृतिका कामरा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT