Akanksha Dubey death case: Bhojpuri Actress Akanksha Dubey Mother Video Viral After Daughter Death Samar Singh 
मनोरंजन

Akanksha Dubey death case: 'माझ्या लेकीला जाऊन चार महिने झाले मात्र..' आकांक्षा दुबेची आई अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत..

आकांक्षा दुबेच्या आईने तिच्याच इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आक्रोश करतांना दिसली.

Vaishali Patil

Bhojpuri Actress Akanksha Dubey Mother Video Viral: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या करत आपलं जिवन संपवलं होतं. वाराणसीतील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला आहे. आता आकांक्षाच्या मृत्यूला 4 महिने झाले मात्र तरीही या प्रकरणाचा अद्याप तपास सुरु आहे.

आता आकांक्षाच्या आईनं एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यात तिने तिच्या लेकीसाठी न्याय मागितला आहे. आकांक्षा दुबेच्या आईने तिच्याच इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आक्रोश करतांना दिसली.

या व्हिडिओत आकांक्षाची आई म्हणते की, तिच्या मुलीच्या मृत्यूला ४ महिने झाले आहेत, पण तिच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी भोजपुरी इंडस्ट्रीतुन कोणीही पुढे आलेलं नाही. प्रत्येकजण स्वतःमध्ये व्यस्त आहे . सगळे गप्प का आहेत. कोणीही काहीही बोलायला पुढे येत नाहीत. माझी मुलगी आकांक्षा भोजपुरी इंडस्ट्रीला तिचं कुटुंब मानायची. तिचं कुटुंब आता कुठे गेले? जे माझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकतो.

आकांक्षाची आई व्हिडिओमध्ये असेही म्हणते की, पवन सिंह , राकेश मिश्रा माझ्या घरी आले मात्र माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे का आला नाही? तिची आई सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. त्यांनी या व्हिडिओत समर सिंग आणि संजय सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या आईने भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा सहकारी संजय सिंह यांच्यावर हत्येचा आरोप केला ,त्यांनी आकांक्षावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे.

यापुर्वीही आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात समर सिंहवर आकांक्षाच्या कुटूंबाने गंभीर आरोप केले आहेत. समर सिंह त्यांच्या मुलीला धमकावत असल्याचा आरोप मामा, मावशी आणि आजोबांनी केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. एवढेच नाही तर त्याने आकांक्षाकडून ५ कोटी रुपये घेतले होते. तिने त्याच्याकडे पैसे मागितले असता तो तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. असे अनेक आरोप आकांक्षाच्या आईने केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT