bhojpuri singer babul bihari
bhojpuri singer babul bihari Esakal
मनोरंजन

Babul Bihari Arrested: प्रसिद्ध गायकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Vaishali Patil

भोजपुरी सिनेसृष्टी सध्या खुपच चर्चेत आली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील अभिनेते आणि अभिनेत्रीच नव्हे तर गायकही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यातच आता भोजपुरी इंडस्ट्रीतुन धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध भोजपुरी गायक अभिषेक उर्फ ​​बाबुल बिहारी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बाबुल बिहारी हा भोजपुरी गायक आहे. त्याचं खरं नाव अभिषेक असं आहे. बिहारमध्ये वास्तव्यास असलेल्या बाबुल बिहारीचं युट्यूब चॅनेलही आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी बुधवारी पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. यात 13 वर्षीय पीडितेने संपूर्ण घटना क्रम पोलिसांना सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण दोन वर्षे जुनं आहे. गायक बाबुल बिहारी याने दोन वर्षांपूर्वी एका १३ वर्षीय मुलीला फूस लावली. तिच्याशी मैत्री केल्यानंतर तो तिला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला, तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर तिचे काही फोटोही काढले. या घटनेनंतर तरुणीने आरोपीपासून लांब राहिली.

(bhojpuri singer babul bihari arrested)

इतके दिवस पीडितेच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती नव्हती. बाबुल बिहारी याने दोन वर्षांनंतर या घटनेची आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली, त्यानंतर तो पकडला गेला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी ही फोटो पाहिल्यानंतर त्यांनी मुलीची चौकशी केली. त्यानंतर पीडितेने त्या घटनेची माहिती दिली. यानंतर मुलीच्या पालकांनी बुधवारी पोलिसात धाव घेतली.

पीडितेची चौकशी केल्यानंतर सेक्टर-14 पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.

एफआयआरच्या आधारे, आरोपीला काही तासांत अटक करण्यात आली, पोलिस प्रवक्ते सुभाष बोकन म्हणाले, त्याला शहर न्यायालयात हजर केले गेले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT