Rajpal Yadav and Kartik Aaryan in a still from Bhool Bhulaiyaa 2.  Google
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 2 teaser: 'रुह बाबा येतोय'; कार्तिक दिसला हटके अंदाजात

'भूलभूलैय्या २' सिनेमा २० मे,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी(Kiara Advani) अभिनित 'भूलभलैय्या २' विषयी सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगलेली दिसतेय. सिनेमाची घोषणा झाल्यापासून त्याचा नवीन लूक कसा असेल याबाबत सगळ्याच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता सिनेमा प्रदर्शनासाठी पूर्णपणे तयार आहे. आजच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. हा सिनेमा २० मे,२०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

कार्तिक आर्यन या कॉमेडी हॉरर 'भूलभूलैय्या २' सिनेमातील त्याच्या हटके लूकमध्ये कमाल वाटतोय. कार्तिकनं स्वतः आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर या सिनेमाचा टीझर शेअर केला. त्यानं कॅप्शनही अगदी समर्पक दिलंय. त्यानं लिहीलंय,''रुह बाबा येतोय, सांभाळून रहा मंजुलिका''. तर कियारा अडवाणीनं या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलंय,''हॉंटेड हवेली आपले दरवाजे पुन्हा खोलण्यासाठी तयार आहे. तुम्ही तयार आहात का?'' या दोन्ही स्टार्सच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी मात्र मोठ्या संख्येनं पसंती दिली आहे.

'भूलभूलैय्या २' च्या टीझरविषयी बोललो तर,यामध्ये 'आमी जे तुम्हारो' चा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आणि तो ऐकल्यावर आपल्याला अक्षय कुमार,विद्या बालनच्या 'भूलभूलैय्या' ची आठवण नक्कीच येईल. या टीझर मध्ये कार्तिक आर्यनचा चेहरा दिसतो,ज्यात तो गळ्यात रुद्राक्षची माळ घातलेला,डोक्यावर कफ्तान बांधलेला आणि अंगात कुर्ता-पायजमा घातलेल्या लूकमध्ये दिसत आहे. याच टीजरमध्ये राजपाल यादवची देखील एक झलक दिसते.

'भूलभूलैय्या २' च्या पहिल्या भागात अक्षय कुमार,विद्या बालन,शायनी अहूजा असे कलाकार होते. सिनेमाला लोकांनी खूप पसंतही केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांचं होतं. तर 'भूलभूलैय्या २' मध्ये कार्तिक आर्यन,कियारा अडवाणी सोबतच तब्बू,राजपाल यादव,संजय मिश्रा असे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बझमी यांनी केलं आहे. कार्तिक आर्यनचे बरेच सिनेमे एकापाठोपाठ एक असे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. 'शहजादा',तेलुगु हिट 'अला वैकुंठपुरमुलु' चा रीमेक,हंसल मेहता चा 'कॅप्टन इंडिया' या विविध सिनेमात तो दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT