Bhumi Pednekar  Sakal
मनोरंजन

Bhumi Pednekar: भूमीने सिद्धार्थ-कियाराच्या पार्टीत मिस्ट्री मॅनला केलं किस; व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या भूमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अलीकडेच सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच वेळी, रिसेप्शनचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे अतिशय मजेशीर पद्धतीने डान्स करताना दिसले. सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न जैसलमेरमध्ये झाले होते. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध स्टार्स पोहोचले होते.

दुसरीकडे, मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये सिड-कियाराचं रिसेप्शन पार पडलं तेव्हा इथेही सेलेब्सची झुंबड उडाली होती. सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, आदित्य रॉय कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यांसारख्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली असली तरी भूमी एका खास कारणामुळे चर्चेत राहिली.

सध्या भूमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमधून बाहेर पडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भूमी तिच्या कारमध्ये बसताच एक व्यक्ती तिला सी ऑफकरण्यासाठी येतो आणि यावेळी अभिनेत्रीच्या ओठांवर किस करतो. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकीकडे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत, तर दुसरीकडे ही व्यक्ती कोण आहे, असे काहीजण विचारू लागले आहेत.

भूमी पेडणेकरसोबत दिसलेल्या व्यक्तीचे नाव यश कटारिया आहे. यश कटारिया 28 वर्षांचे असून तो व्यवसायाने व्यापारी आहे. तसेच बिल्डर असलेला यश कटारिया हा बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा जवळचा मित्र आहे.

भूमी यशला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र, या वृत्तांची अद्याप पुष्टी झालेली नाही. अशा परिस्थितीत जेव्हा यश कटारिया भूमीला सी ऑफ करायला गाडीपर्यंत पोहोचला आणि लिप-लॉक केला तेव्हा तो पापाराझींच्या कॅमेऱ्यापासून वाचू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT