Salman Khan
Salman Khan Google
मनोरंजन

सलमानच्या नादाला लागली अनं तोंड लपवण्याची पाळी तिच्यावर आली...

प्रणाली मोरे

सलमान खाननं(Salman Khan) म्हणे अनेकांचं करिअर घडवलंयही तर अनेकांच्या करिअरचे तीन तेराही वाजवले आहेत. बरं त्यांची नावं घ्यायची झाली तर ती लिस्ट मोठी आहे. पण त्यातल्या त्यात ज्यांचं करिअर बिघडवलंय त्यांच्यापैकी जर कोणाचं नाव घ्यायचं झालं तर विवेक ओबेरॉयचं नाव पटकन तोंडावर येईल. कारण अभिनयाची क्षमता असूनही केवळ ऐश्वर्यामुळे सलमानशी घेतलेला पंगा त्याला चांगलाच महाग पडलेला आहे. पण याच सलमानने अगदी ऐश्वर्यापासनं कतरिना कैफ,जॅकलिन फर्नांडिसपर्यंत सगळ्यांना मदतीचा हात देऊन त्यांचं करिअर सेट केलंय. ऐश्वर्यासाठी तर त्यानं काय काय केलंय हे नव्यानं सांगायला नकोच. पण आता मात्र त्यांच्यातनं विस्तवही जात नाही ही गोष्ट मात्र निराळी. असो,आता हा सगळा सलमानचा इतिहास सांगायचं कारण हेच की पुन्हा एका अभिनेत्रीवर सलमानमुळे तोंड लपवत फिरायची पाळी आलीय म्हणे. काय घडलंय नेमकं,चला सविस्तर जाणून घेऊया.

सलमान सध्या 'बिग बॉस १५' च्या सिझनचं होस्टिंग करतोय. त्यात हा शो अनेकदा वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत येत आहे. अर्थात सलमान विकेंडला बिग बॉसच्या घरातील सगळ्यांची शाळा घेतोच त्याच्या स्टाईलमध्ये. पण तरीही स्पर्धक मात्र टीआरपीसाठी वादाचा मुद्दा निर्माण करण्यात मागे राहत नाहीत हे ही तितकंच खरंय. त्याचं झालं असं की,बिग बॉसमध्ये अफेअर्स होणं हे काही नवीन नाही पण आता चक्क इथली एक अभिनेत्री आपण प्रेग्नंट असल्याचं बोलली आणि ही बातमी वा-यासारखी सगळीकडे पसरली. तर ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ती आहे आपली करण कुंद्रासोबतच्या अफेअरमुळे-नंतर भांडणामुळे चर्चेत असलेली तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash). वास्तविक,तेजस्वी प्रकाश उमर रियाजला ती प्रेग्नंट असल्याचं सांगताना दिसत आहे. मात्र,तेजस्वीने हे सलमान खानच्या सांगण्यावरून सांगितलं आहे बरं का. आगामी प्रोमोमध्ये सलमानने बॉलीवूड स्टार गोविंदासोबत तेजस्वी प्रकाशच्या मदतीनं प्रॅंक करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. आणि हा प्रॅंक फारच मजेशीर आहे. व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईलच आपल्या.

नेमकं घडलं असं की तेजस्वी उमरशी बोलताना म्हणाली की,'मला गॅस झाला आहे'. हे ऐकून उमर हसायला लागला. तेजस्वी रागाने म्हणाली की हा विनोदाचा विषय नाही. सलमानच्या सांगण्यावरून तेजस्वी म्हणतेय,'मी आई बनणार आहे'. हे ऐकून उमर हैराण होतो आणि म्हणतो,'ये तू क्या बोल रही है'. तेजस्वी मजेत पुढे म्हणाली,'गॅसमुळे मुलगी प्रेग्नंट होऊ शकते का?' हे ऐकल्यानंतर उमर रियाझ हसत हसत निघून जातो. हा मजेदार व्हिडीओ पहायलाच हवा. तेजस्वीच्या या बोलण्यामुळे सोशल मीडियावर मात्र उलथापालथ झालीय,यामुळेच तेजस्वी ट्रोलही होतेय. पण तिच्या नॉटीपणाचे लाखो चाहते आहेत त्यामुळे त्याचा तिला फार फटका बसणार नाही ही आशा. पण सलमानचं ऐकल्यामुळे काहीबाही बोलून बसली आणि ती गोत्यात आलीय याकडे दुर्लक्ष करूनही तिनं चालणार नाही. यापुढे घरात सनी लिओन आणि कनिका कपूरचीही एंट्री होणार आहे आणि दोघीही घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT