विकी-कतरिनाच्या लग्नावर अक्षय कुमारची 'ही' प्रतिक्रिया ठरतेय लक्षवेधी

राजस्थानमध्ये शाही थाटात ९ डिसेंबर रोजी दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता...
Vicky Kaushal & katrina kaif,AKshay Kumar
Vicky Kaushal & katrina kaif,AKshay Kumar Google

कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशलचं(Vicky Kauashal) लग्न ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं. त्या लग्नाला या दोघांचे फक्त जवळचे कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणी हजर होते. बॉलीवूडकरांसाठी हे दोघे मोठं रिसेप्शन देणार आहेत अशी चर्चा आहे. या दोघांनाही बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरनं शुभेच्छा दिल्या होत्या. पण यात आता अधिक चर्चेत आली आहे ती कतरिनाच्या फ्रेंडलिस्ट मध्ये सर्वात जवळचा स्टार असलेल्या अक्षय कुमारची(Akshay Kumar)प्रतिक्रिया. त्याने अशा काही हटके स्टाईलमध्ये कतरिना-विकीच्या लग्नावर कमेंट केलीय की त्या प्रतिक्रियेचा व्हि़ीडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

Vicky Kaushal & katrina kaif,AKshay Kumar
जेव्हा साऊथ स्टार अल्लू अर्जुन मराठीत म्हणतो,'सर्वांना माझा नमस्कार'

अक्षय आणि कतरिना यांनी सर्वात जास्त सिनेमे एकमेकांसोबत केले आहेत. त्यांची जोडी ऑनस्क्रीन झकास दिसत असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीचीही मानकरी ठरलीय. आता इतके सिनेमे एकत्र केल्यामुळे हे दोघे चांगलं बॉंड शेअर करतात. नुकताच त्या दोघांचा सुर्यवंशम सिनेमा प्रदर्शित होऊन त्याला बॉक्सऑफिसवर चांगल यशही मिळालं. तर घटना अशी घडली की आपला बॉलीवूडचा हा खिलाडी त्याच्या 'अतरंगी रे' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सारा अली खान सोबत कपिल शर्मा च्या शो मध्ये आला होता. तेव्हा त्यानं आपल्या नेहमीच्या माजकियॉं स्टाईलने थेट विकी-कतरिनाच्या लग्नालाच लक्ष्य केलेलं व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय.

या व्हिडीओ च्या सुरुवातीला अक्षय कुमार काही मॅजिकल ट्रिक करताना दिसतोय. त्यानंतर कॉमेडियन कीकू शारदाची एन्ट्री होते. आणि तो थेट विकी कतरिनाच्या लग्नाचा विषय छेडतो. तो म्हणतोय,'मी आताच राजस्थामध्ये बॉलीवूडच्या एका हायप्रोफाईल लग्नाला हजेरी लावून आलोय. असं राजेशाही लग्न मी आयुष्यात कधीच पाहिलं नाही. कारण त्यांनी ते मला पाहूच दिलं नाही'. त्यावर अक्षय कुमारनं मजेशीर प्रतक्रिया देताना म्हटलं,''तुम्ही तिथे किट-कॅटही खाऊन आला असाल''. आणि अक्षयच्या या प्रतिक्रियेवर सारा अली खानपासून सारेच लोटपोट होऊन हसले. विकी-कतरिना आता आपापल्या सिनेमाच्या शुटिंगसाठी रुजू झाले आहेत. पण अक्षयच्या या प्रतिक्रियेवर सवड मिळताच कतरिना आपल्या स्वभावानुरूप प्रतिक्रिया देईलच यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com