Big Boss 4: Tejaswini Lonari on Handsome Actor in Marathi Industry Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: मराठी इंडस्ट्रीत हॅन्डसम अभिनेता कोण? तेजस्विनीनं घेतलं कोणाचं नाव? वाचा

बिग बॉस मराठी ४ सुरु होऊन दहा दिवस झाले आहेत, आणि वादासोबत या घरात होणारी मजा-मस्ती आणि गॉसिपही लोकांचा शो मधील सहभाग वाढवत आहे.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस शो म्हटला की नेहमी वादच त्या घरात पहायला मिळाले पाहिजेत असं बिलकुल नाही बरं का. इथे विविध विचारांची,स्वभावाची लोकं एकत्र आली की विविध विषयांवरच्या गप्पांचा फडही या घरात रंगतो. कधी त्यातून मजा-मस्ती केली जाते, कधी गॉसिपची शाळाही भरते तर कधी भावनेच्या आहारी जाऊन कोणा ना कोणाच्या वैयक्तिक आयुष्याचा पटही उलगडतो. बिग बॉस मराठीच्या घरातही यंदा असंच काहीसं हळूहळू पहायला मिळत आहे.

भांडण हा या घराचा युएसपी असला तरी मजा-मस्तीनेही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होत आहे. पण आता नुकतंच रोखठोक स्वभावाच्या तेजस्विनी लोणारीनं जिला आपण 'देवमाणूस २' ची आमदार बाई म्हणून ओळखतो तिनं थेट मराठी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्यांवरच मोठा शाब्दिक वार केला आहे. आणि इंडस्ट्रीत कोणी हॅन्डसम अभिनेता नाही म्हणत एकप्रकारे सगळ्या अभिनेत्यांना हिणवलं आहे. नक्की काय आहे पूर्ण बात, चला जाणून घेऊया.(Big Boss 4: Tejaswini Lonari on Handsome Actor in Marathi Industry)

बिग बॉस मराठीच्या घरात अमृता आणि तेजस्विनीमध्ये लग्नाविषयी गप्पा सुरु असतात. तेव्हा तेजस्विनी पटकन म्हणून जाते, 'माझ्या भावाने वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केलं'. तेव्हा अमृता म्हणते कि,'मग तु का नाही केलंस?', त्यावरनं तेजस्विनी अमृताला म्हणते, ''असं कुणी भेटलं नाही, आणि आपल्याला ज्याच्यासोबत लग्न करायचं असतं,त्याला आपल्यासोबत लग्न करायचं नसतं''. तेव्हा अमृतानं एक विचार मांडायचा म्हणून म्हटलं,'अगं मग इंडस्ट्रीत कुणी भेटलं नाही का तुला?' त्यावर तेजस्विनी मोठ्या तोऱ्यात म्हणाली, "इंडस्ट्री मध्ये कोण आहे ? कोणी आहे का हॅन्ड्सम, कोणीच नाही ... मला तरी नाही आवडत इंडस्ट्रीमधलं..."

आता तेजस्विनीच्या या मतावरनं इंडस्ट्रीत चर्चा रंगणार यात वाद नाही. आणि पुढे बिग बॉसच्या घरामधून बाहेर आल्यावर तिला कामही करायचं आहे इंडस्ट्रीत हे कदाचित ती विसरली असावी. असो, तेजस्विनीनं एकाच फटक्यात मराठी अभिनेत्यांचा केलेला अपमान अनेकांना खटकणार हे ओघाने आलंच. एपिसोड पाहिल्यावर यावर काय प्रतिक्रिया येतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT