anil thatte 
मनोरंजन

बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- देशभरात कोरोना व्हायरसचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता सहा लाखांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. सामान्य माणसांपासून राजकारणी , सेलिब्रिटी अशा सगळ्यांनांच कोरोनाने ग्रासलं आहे. नुकतंच सेलिब्रिटींमध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. स्वतः अनिल थत्ते यांनीच व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 

अनिल थत्ते यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे, 'सध्या मी हॉस्पिटलमध्ये असून मला कोरोनाची लागण झाली आहे. गेले अनेक दिवस कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. परंतु तो व्हायचा तेव्हा होणार या निष्कर्षाला आज मी येऊन पोहोचलो आहे.

एवढी काळजी घेऊनही जर कोरोना होणार असेल तर काय बोलणार? आता कोरोनाची भिती गेली. तसंच कोरोनासोबतंच डायबेटीस वगैरे सारखे अन्य आजार असूनही प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आजारातून पूर्णपणे बरं झाल्यावर प्लाझ्मा देण्याचाही माझा संकल्प आहे' असं थत्ते यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय.  

कोरोनाबाधित रुग्ण्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ८६ हजार ६२६ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ६३२८, दिल्लीमध्ये २३७३ एवढी झाली आहे. देशात गुरुवारी एका दिवसात कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकुण बाधित रुग्णांची संख्या ६ लाखांपेक्षा जास्त आहे.

तर माहाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वात जास्त रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली होती.   आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ कोरोनाच्या ऍक्टीव्ह केसेस आहेत.   

big boss fame anil thatte found corona positive shares video  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

पोस्टाची ५० वर्षे जुनी सेवा बंद, रजिस्टर्ड पोस्ट ऐवजी आता स्पीड पोस्ट; खर्च वाढणार

'दादा, यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही'; २४ वर्षीय नवविवाहित प्राध्यापिकेनं चिठ्ठी लिहून संपवलं जीवन, पती-सासरकडून होत होता छळ

Latest Maharashtra News Updates Live : पुण्यातील गणेश मंडळांची बैठक सुरू

लग्न न करताच बाबा होणार 'सैराट' फेम अभिनेता? गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो, आईचा विरोध होता म्हणून...

SCROLL FOR NEXT