Mira Jagannath Google
मनोरंजन

'तिखट मीरी' मीरा जगन्नाथनं केली घरातल्या प्रत्येकाची पोल खोल...

'ईसकाळ'ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत नावं घेऊन ती म्हणाली...

प्रणाली मोरे

'मराठी बिग बॉस ३' हा शो नुकताच संपला. विशाल निकमनं बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तो घराच्या बाहेर आल्यावरही 'मी खरा माणूस म्हणून बिग बॉसच्या घरात राहिलो म्हणून ही ट्रॉफी जिंकू शकलो', असं प्रत्येक मुलाखतीतून सांगतोय. पण त्याचं हे म्हणणं मात्र त्याच्यासोबत घरात स्पर्धक म्हणून गेलेल्या मीरा जगन्नाथला कुठेतरी फारसं पटत नाहीय. तिनं 'ईसकाळ'ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत विशाल नेमका कसा आहे जो तिला घरामध्ये कळलाय याविषयी स्पष्ट आपलं मत मांडलं.

मीराचे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांशी खटके उडताना दिसले. तिनं घरात फारसं असं कोणाला सोडलं नाही ज्यांच्याशी तिचे वाद झाले नसावेत. पण त्यातल्या त्यात विशाल,विकास,सोनाली,मिनल यांच्यासोबत मात्र तिचं शेवटपर्यंत जमलं नाही. त्याविषयी मुलाखतीत ती म्हणाली,''एकतर मी खूप लवकर कोणाशी कनेक्ट होत नाही. मला वेळ लागतो. त्यात या चौघांसोबत काही ना काही कारणावरनं खटके उडायचे म्हणून आम्ही कनेक्ट फारसे झालो नाही. आता मुलाखतीत मीरानं या प्रत्येकाच्या स्वभावाला एक नाव ठेवत एकप्रकारे त्यांची पोल खोल केली आहे की हे चौघे नेमके कसे आहेत. यात तिनं आपल्या गटातल्या उत्कर्ष शिंदेलाही सोडलं नाही. ती म्हणाली,''उत्कर्षची स्ट्रॅटेजी होती का घरात कसं वागायचं याबद्दल मला माहीत नाही पण मला तो ....''. आता तिनं उत्कर्षच्या स्वभावाची नेमकी काय पोल खोल केलीय ते मुलाखत जोडलेली आहे इथे ती ऐकाल तर स्पष्ट होऊन जाईल,एवढं नक्की.

मीरा जगन्नाथ हीची पॉडकास्ट मुलाखत इथे जोडलेली आहे,नक्की ऐका.

तिनं या मुलाखतीत 'बिग बॉस' कार्यक्रमाचे धन्यवाद मानले आहेत. ''या कार्यक्रमामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या अधिक जवळ आलो. आपल्या वडिलांसोबतचं नातं अधिक दृढ झालं'', असं ती म्हणाली. ''बिग बॉस मध्ये मी नेहमी भांडायचे म्हणून लोकांनी भांडखोर समजलंअसेल बहुधा. पण म्हणून काही मला खलनायिकेच्या भूमिका ऑफर झाल्या तर फक्त त्याच त्याच भूमिका मला करायच्या नाहीत. मला वेगवेगळया प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत'',असंही मीरा म्हणाली. तर आता बातमीत जोडलेली ही पॉडकास्ट मुलाखत ऐकलात तरंच कळेल की बिग बॉसच्या घरातल्या कोणत्या सदस्याचं नाव घेऊन नेमंक मीरा काय म्हणाली. ऐकलात का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT