Big Boss Marathi 4, Apurva Nemlekar want to change her name from nameplate Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात कोण आहे कानफाट्या? अपुर्वानं जाहीर केलं नाव...

बिग बॉस मराठी ४ सिझन सुरु होऊन आता दहा दिवस लोटलेयत. हळूहळू घरातील सदस्यांचे राग-रंग आता समोर येतायत.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ सिझन सुरु होऊन आता दहा दिवस झाले आहेत. हळूहळू घरातील सदस्यांचे राग-रंग आता समोर येतायत. शो मध्ये खऱ्या अर्थानं रंग भरणाऱ्या चावडीवर मांजरेकर मास्तरांनी घरच्यांची चांगलीच शाळा घेतलेलेली आपण सर्वांनीच पाहिली. पण असं असलं तरी घरात वाद होणारच,भांडणं रंगणारच कारण त्याला विराम मिळाला तर मग शो कोण पाहणार, नाही का?

नेहमीच गोड-गोड वागणारे सदस्य कोणाला आवडणार. शेवटी तडक-फडक भांडणाचा ठसका हवाच. असो असं असलं तरी घरातील मजा-मस्ती,मस्करीही धमाल आणते कधी-कधी. आता घरात लवंगी मिरची म्हणून जिला कदाचित काही दिवसांत मान्यता मिळेल अशा अपूर्वा नेमळेकरचं घरातील सदस्यांनी नाही तर तिनं स्वतःहूनच एक नामकरण केलंय. चला,जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच जरा मज्जा मस्ती देखील बघायला मिळणार आहे. डायनिंग टेबलवर भांडणं नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत. कोण आहे कानफाट्या ? अपूर्वा का म्हणते आहे माझं नावं कानफाट्या ठेवा आता ...

झालं असं...कि रोहितने समृद्धीला विचारले,'तुझा आज बुबू बघितला नाही...', त्यावर समृद्धीचे म्हणणे पडले, 'त्याला बरं नाही वाटतं आहे झोपला आहे त्याला अपूर्वाची नजर लागली आहे, सारखी चिमटे काढत असते त्याला'. त्यावर अपूर्वा म्हणाली, "झालं त्याला पण माझीच नजर लागली. कानफाट्या नावं ठेवलं आहे माझं. तिथल्या नेमप्लेट वरील माझं नावं बदलून कानफाट्या ठेवा. काही झालं तरी घुमून फिरून माझ्यावरच येते आहे”.

प्रेक्षकांना भांडणा सोबतच ही मजा-मस्करी देखील पहायला मिळते हा बोनसच म्हणावा. तेव्हा घरात अजून काय काय घडतं ते पाहण्यासाठी बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात

Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन, नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण

पोलिस आयुक्तांनी काढला ‘डीजे’वरील निर्बंधाचे आदेश! गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए-मिलादच्या मिरवणुकीत नाही 'डीजे'ला परवानगी; आदेश मोडल्यास होणार ‘ही’ शिक्षा

Nilesh Rane on Manoj Jarange : जरांगेंनी भावाला चिचुंद्री म्हटलं, आमदार निलेश राणे भडकले; म्हणाले, राणे कुटुंबावर...

Shahu Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; म्हणाले, 'सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

SCROLL FOR NEXT