Big Boss Marathi 4: काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये "विषय END" हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे सदस्य नॉमिनेट झाले. अक्षय आणि टीम B ने मिळून रुचिराला नॉमिनेट केले. आज रुचिरा - रोहितमध्ये तसेच अपूर्वा आणि समृद्धी मध्ये यावरनं चर्चा रंगलेली पहायला मिळेल. नेमकं काय खिचडी शिजलीय यांच्या चर्चेत? (BIg Boss Marathi 4, Apurva-Rutuja Cold War)
अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे,''माझ्या आणि प्रसादच्या argument मध्ये मी देशमुखला काय म्हणाले stay out of this. विषय माझा आणि त्याचा आहे आम्ही ते बघून घेऊ. तुला विचारले आहे का? तुझा मुद्दा आला की आपण बोलू. मग तसं मी रिस्पेक्टनं बोलले की, ''तुम्ही दोघ बोलून घ्या जेव्हा तुमचं होईल तेव्हा मला सांग. मी तिला काय बोलले रात्री, तुला बोलावंस वाटलं कि सांग मला पण आता नाही मला झोप येते आहे उद्या बोलू''.
तर रुचिरा आणि रोहितची नॉमिनेशन वरून चर्चा रंगली आहे. रुचिराचे म्हणणे आहे,''जो निकष दिलाच नव्हता , त्या नसलेल्या निकषावर त्यांनी मला नॉमिनेट केलं आहे''. अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे,''जेव्हा मी नॉमिनेट झाले होते तेव्हा किती लोकं आली होती. केवढे लोकं येऊन बोलले होते माझ्या बाजूने. मी माझ्या प्रॉब्लेमला केलं ना डील माझं-माझं''.तेव्हा समृद्धीनं अपूर्वाला लगेच म्हटलं,''सगळेच करतात मी पण केलं''. आता रुचिरा अपुर्वाविषयी आणि अपुर्वा रुचिराविषयी हे बोलताना दिसणार आहे. नॉमिनेशन प्रक्रियेनंतर आता अपूर्वा-रूचिरामधलं कोल्ड वॉर रंगलेलं पहायला मिळणार.
तिकडे रुचिरा रोहितला सांगताना दिसणार आहे,''नेहमी रुचिरा patience ठेवेल... माझे patience काढताना ती एक वाक्य म्हणाली माझे patience नव्हते. तुझे patience संपले आहेत, माझे संपले नाहीयेत patience पण माझे sequence wise संपत आहेत...'' हे सगळं संतापानं रुचिरा अपुर्वाबद्दल बोलतेय बरं का.
पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.