Big Boss Marathi 4, arguments between contestants Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: घराच्या काचा फुटेपर्यंत मारामाऱ्या, बिग बॉसच्या घरात हाणामारी

बिग बॉस मराठीच्या घरात लगोरीच्या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये मोठा राडा झाला, सध्या सोशल मीडियावर तो राडा व्हिडीओच्या रुपात व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: 'जो सर्वाधिक लगोरीचे थर रचेल त्याला कॅप्टन बनण्याचा मान मिळेल' या कॅप्शनसोबत सध्या बिग बॉस मराठीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत घरातील सदस्य सज्ज दिसत आहेत पारंपरिक लगोरी खेळ खेळण्यासाठी, किरण माने त्यांना खेळाचे नियम समजावताना दिसत आहेत.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

तेवढ्यात पुढच्या कटला व्हायरल व्हिडीओत समोर येतं,घरात एकमेकांना बकोटीत धरलंय कुणी तर कुणी कुणाच्या अंगावर बसलंय तर कुणी कुणाला घेऊन थेट काचेवर आदळलंय...मोठ्ठा राडा आजच्या भागात पहायला मिळणार हे नक्की.

बिग बॉस मराठीच्या घरात हा राडा सुरू आहे कॅप्टन्सीच्या पदावरुन आणि यासाठी यशश्री व समृद्धीची टीम आपापसात भिडणार आहेत. लगोरीचा हा खेळ पारंपरिक पद्धतीनं खेळला जायचा तिथवर ठीक होतं पण बिग बॉस मराठीच्या घरात त्याला मिळालेलं हिंसक वळण पाहून पुन्हा कोण लगोरी खेळायचं धाडस करेल की नाही हे मात्र सांगता यायचं नाही. त्रिशुल आणि प्रसादच्या झटापटीत,प्रसादनं त्रिशुलला घरातल्या काचेवर आपटलं अन् धाडकन घराची काच फुटलेली व्हिडीओत दिसतेय. आता पुढे काय घडलं त्यानंतर हे पाहण्यासाठी सारेच प्रेक्षक उत्सुक आहेत पण तितकेच चिंतेतही असल्याचं सोशल मीडियावरील कमेंटमधून लक्षात येत आहे. सदस्यांमधला हा राडा पहायचा राहून गेला असेल तर Voot वर नक्कीच पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT