Big Boss Marathi 4 contestants fights and tasks, promo viral Instagram
मनोरंजन

Big Boss Marathi 4: टास्क दरम्यान असं काय भयंकर घडलं की अपुर्वानं फोडली किंचाळी...

बिग बॉस मराठी 4 सुरु होऊन काहीच दिवस झाले असताना,आता खेळ रंगू लागलाय घरातील सदस्यांच्या भांडणाने आणि जीवघेण्या टास्कनी.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठी सुरु होऊन अवघे तीन-चार दिवस सुरु झाले असताना खेळात रंग भरू लागलेयत सदस्यांमधील खटके आणि टास्क. अर्थात हा खेळच असा आहे की इथे घरातील कॅमेऱ्यांसमोर सतत राहणं, आपल्या नावाची चर्चा होईल असा गेम खेळणं, टास्कमध्ये हिरिरीनं भाग घेणं, सहनशील राहून शत्रूला मात देणं आणि गोड बोलून मैत्रीतही काटा काढणं ....हे करण्यात जो कुणी यशस्वी होईल तोच ठरतो बिग बॉस विनर...आता बिग बॉस मराठी ४ च्या घरातही यासाठी सुरु असलेली धडपड दिसू लागलीय. पहिल्याच धडक-बेधडक टास्कमध्ये सगळ्यांचाच गोंधळ उडालेला दिसून आला, त्यादरम्यान घरातील एक सदस्य जखमी होता होता वाचला. नेमकं काय झालं हे आजचा एपिसोड पाहिल्यावर कळेलच पण सध्या व्हायरल प्रोमोत अपुर्वाची किंकाळी मात्र थरकाप उडवतेय.(Big Boss Marathi 4 contestants fights and tasks, promo viral)

बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये धडक-बेधडक हा टास्क पाहता येईल. यात सदस्यांचा भलताच गोंधळ उडालाय हे व्हायरल प्रोमोत दिसून आलेय. कोण जीवाच्या आकांतानं पळतंय तर कोण जीवघेणी किंकाळी फोडतंय. याच भागात घरातील एका महिला सदस्याला टास्क दरम्यान उंच टेबलावरुन दणकन जमीनीवर पडल्यानं चांगलंच लागलं आहे तर तिला पडताना पाहून बाजूला उभ्या असलेल्या अपुर्वा नेमळेकरनं फोडलेली किंकाळी चांगलाच थरकाप उडवून सोडतेय. तो व्हिडीओ बातमीत जोडलेला आहे,तेव्हा आपण अंदाज घेऊ शकाल या जीवघेण्या टास्कचा.

बिग बॉस मराठी ४ चा हा एपिसोड आज रात्री ४ ऑक्टोबर रोजी १० वाजता पाहता येईल आणि मिस झाला एपिसोड तर Voot App वरही पाहता येईल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार नॉमिनेशन कार्यादरम्यान अमृता देशमुखने सदस्यांवर नाराजी व्यक्त केली. तिचे म्हणणे आहे,"बर नाहीये हे दिसते आहे तरी माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात." तर त्रिशूलने निखिल राजशिर्के यांना जागवायची गरज आहे म्हणून नॉमिनेशनमध्ये टाकले. आता बघूया पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य होणार सेफ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? म्हणजे नॉमिनेशन सोबतच टास्कचा थरार असा एकंदरीतच मनोरंजनाचा डबल डोस बिग बॉस मराठी ४ या आठवड्यात देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT