Big Boss Marathi 4- Mahesh Manjrekar big announcement about show. Instagram
मनोरंजन

Big Boss Marathi 4: 100 दिवसांच्या खेळाची जाहीर झाली तारीख, मांजरेकर म्हणाले,'यंदा..'

गेल्या अनेक दिवसांपासून महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सिझन ४ विषयी मोठी घोषणा करणार ही चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरचा सर्वात मनोरंजक शो म्हणजे बिग बॉस. या शो नं हिंदीत जितकी प्रसिद्धी मिळवली तितकच मराठीतही लोकांनी या शो ला उचलून धरलं. हिंदीत होस्ट म्हणून सलमान खान तर मराठीत महेश मांजरेकर ही तर अख्ख्या महाराष्ट्रची पसंत राहिली आहे. या शो चा एक सिझन संपल्यावर दुसऱ्या सिझनची घोषणा कधी होतेय याची लोक चातकासारखी वाट पाहत असतात. मराठी बिग बॉसच्या तिन्ही सिझननी लोकांचे कमालीचे मनोरंजन केले त्यामुळे अर्थातच सिझन ४ विषयी औत्सुक्य आहेच. गेल्या काही दिवसांपासून शो कधी सुरु होणार याची चर्चा रंगली होती. महेश मांजरेकर मोठी घोषणा करणार असं बोललं जात होतं. त्या चर्चांना पूर्णविराम देत मांजरेकरांनी शो च्या ग्रॅंड प्रिमियरची घोषणा करत तारिखही जाहीर केली आहे. चला याविषयी जाणून घेऊया सविस्तर. (Big Boss Marathi 4- Mahesh Manjrekar big announcement about show.)

सुरुवातीला बिग बॉस सिझन ४ सुरू होतोय म्हटल्यावर तो मांजरेकरच करणार अशी चर्चा रंगली.पण मध्येच बातमी आली यंदा महेश मांजरेकर शो होस्ट करणार नसून कुणी दुसरा स्टार त्यांची जागा घेणार आहे. त्यामुळे शो चे चाहते मात्र नाराज झाले. कारण महेश मांजरेकरांचे स्वभावातले गोड,कडू,तिखट,खोडकर,विनोदी सगळेच राग प्रेक्षकांना ते शो होस्ट करताना अनुभवायला आवडतात. पण जेव्हा हा शो मांजरेकरच करणार हे कळले तेव्हा मात्र चाहत्यांना हायसे वाटले आणि शो कधी सुरू होतोय याची ओढ लागली. कलर्स वाहिनीनं मांजरेकरांच्या खास शैलीत शूट केलेला एक व्हिडीओ पोस्ट करत शो कधी सुरू होत आहे त्या तारखेची घोषणा केली आहे. तो प्रोमो बातमीत जोडत आहोत. नक्की पहा,

तर बिग बॉस मराठी सिझन ४ येत्या २ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९.३० वाजता अशी वेळ आहे. शो संदर्भातील पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'100 दिवसांचा हा खेळ
कधी पास, कधी फेल.
पण महेश सरांच्या मते, यंदा 'All is well'
पाहायला विसरू नका "BIGG BOSS मराठी" Grand Premiere 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम - शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर!'

आता उत्सुकता २ ऑक्टोबरची, कोणते मराठीतील कलाकार यंदा या घरात बंदिस्त होणार हे जाणून घेण्याची...लवकरच त्यांची नावेही आपल्यापर्यंत आणूच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT