Mira Jagnnath Google
मनोरंजन

बिग बॉसची तिखट मिर्ची मीरा जगन्नाथनं गुढीची पुजा करीत मागितलं 'हे' मागणं

चैत्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नांची नवी वाट म्हणत मीरा जगन्नाथनं चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रणाली मोरे

आज गुढीपाडवा(Gudhipadwa),साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक समजला जाणारा शुभ मुहूर्त. आज सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सारेच हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात. आपले मराठी कलाकार तर आवर्जुन अनेकजण यादिवशी गुढी उभारताना दिसतात. नेहमीच ग्लॅमरस,मॉर्डन पेहरावात असणारे अनेक सेलिब्रिटी या मराठमोळ्या सणाच्या निमित्तानं पारंपरिक साजशृंगार करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या आजच्या खास साजशृ्ंगाराचे फोटो पोस्ट केलेले दिसून आले. 'बिग बॉस मराठी 3' मधली ग्लॅम डॉल,तिखट मिर्ची मीरा जगन्नाथ(Mira Jagnnath)नं देखील यंदाचा गुढीपाडवा पारंपरिक अंदाजात साजरा केला आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथ हे 'मराठी बिग बॉस 3' मधलं चर्चेतलं नाव. त्यावेळी अनेक वादांनी मीरा चर्चेत राहिली. नेहमीच दुसऱ्यांशी बिग बॉसच्या घरात भांडणारी मीरा प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूपच ट्रेडिशनल आहे बरं का, म्हणजे अगदी सगळ्या सणांना ती पांरपरिक पद्धतीनं साजरं करताना दिसते. आज गुढीपाडव्याच्या दिवशीही तिनं छान गुढीला सजवून उभारलं,तिची साग्रसंगीत पूजा केली,मनोभावे गुढीला हात जोडणारी मीरा यावेळी प्रत्येकाला भावली असणार हे निश्चित. मीरानं छानं ट्रेडिशनल साडीचा पेहराव करत पारंपरित साजशृंगारही केलेला दिसत आहे. अर्थात तिनं आपल्या गुढीपाडवा सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेले दिसून आले आहेत.

''चैत्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नांची नवी लाट,नवा आरंभ, नवा विश्वास,नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!'' अशी खास पोस्टही मीरानं आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना केली आहे. या पोस्टच्या निमित्तानं गुढीकडे यापुढे सगळं कुशलमंगल होवू दे हे मागणं मागितलं आहे. बिग बॉस(Big boss marathi3) मधून बाहेर पडल्यावर मीरा जय दुधाणेसोबत एका व्हिडीओ अल्बममधून आपल्या समोर आली आहे. काही सिनेमातनंही ती आपल्याला लवकरच दिसेल अशी देखील बातमी कानावर येतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यात बोगस मतदानाचा अजब प्रकार, मतदान केंद्रावर महिला न येतच तिच्या नावाने कोणीतरी दुसरच करून गेलं मतदान

६,६,६,६,६,६,६,६...! KKR च्या 'ट्रम्प कार्ड'चे वादळी शतक, २ कौटींचा फायद्याचा सौदा; IPL 2026 मध्ये प्रतिस्पर्धींना भरणार धडकी Video

Mohol Nagar Parishad : मोहोळ नगरपरिषदेत 'हायव्होल्टेज' ड्रामा! उपनगराध्यक्षपदासाठी नेत्यांकडे इच्छुकांची मोठी पायपीट!

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शरद पवार गट सक्रिय, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे घेणार मुलाखती

Ahilyanagar News: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये राडा; ५ जण जखमी, काय घडलं?

SCROLL FOR NEXT