Big Boss Marathi season two homes First Look Goes viral
Big Boss Marathi season two homes First Look Goes viral 
मनोरंजन

'बिग बॉस मराठी 2'चा मॉडर्न वाडा! (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

मराठमोळ्या 'बिग बॉस मराठी 2' च्या घराची आज आपण सफर करणार आहोत. शो सुरु होण्यापुर्वीच कसे असेल बिग बॉस मराठीचे घर हे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

झेंडूची फुले, रंगीबेरंगी बांगड्या, तांब्याची भांडी, सुपली, जर्मनची बादली, स्टीलचे डबे, चिनी मातीची भांडी, पाटा-वरवंटा, चहाच्या किटल्या या पारंपरिक गोष्टींचे सजावटीत आणि उपयोगांच्या वस्तूत रुपांतर केले आहे. या घरात 75 कॅमेरा आहे. म्हणजे येथील कुणीही कितीही प्रयत्न केले तरी कॅमेराची नजर चूकवू शकणार नाही. घरातील सर्व रंग लाईट आणि फ्रेश आहेत. या घराला थोडा वाड्याचा फिल आहे. म्हणूनच लाकडाचा प्रभावीपणे वापर घराचा सेट उभारताना केला गेला आहे. 

या घरात वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धक येणार आहेत. तेव्हा सगळ्या क्षेत्रातील स्पर्धकांसाठी घरातील एक खास कोपरा सजवलेला दिसेल. 'वाडा' ही जरी या वर्षीच्या 'बिग बॉस मराठी 2' च्या घराची थीम असली तरी या वाड्याच्या सेटला थोडा आधुनिक टच देण्यात आला आहे. म्हणजेच कन्टेम्प्ररी डिझाइन आपल्याला या घराच्या सजावटीत बघायला मिळेल. झेंडूची फुले, रंगीबेरंगी बांगड्या, तांब्याची भांडी, सुपली, जर्मनची बादली, स्टीलचे डबे, चिनी मातीची भांडी, पाटा-वरवंटा, चहाच्या किटल्या या पारंपरिक गोष्टींचे सजावटीत आणि उपयोगांच्या वस्तूत रुपांतर केले आहे.

'बिग बॉस मराठी 2'च्या घरातील वॉशरुम म्हणजे गॉसिपींगची हक्काची जागा येथील स्पर्धकांसाठी असते. ही गोष्ट लक्षात घेत घराच्या वॉशरुमच्या एंट्रीलाच भिंतींवर राजकीय, पुढारी, पुणेरी, फेटा अशा विविध टोप्या घालून पोपटचे चित्र रेखाटले आहे. 

'बिग बॉस मराठी 2' च्या वाड्याची एक झलक -
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT