Big Boss16 esakal
मनोरंजन

Big Boss16: सलमानच्या घराबाहेर आंदोलन; साजिद खानविरोधात शर्लिन आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

चित्रपट निर्माता साजिद खान सध्या बिग बॉस 16 मध्ये दिसत आहेत. शोमध्ये त्याची एन्ट्री वादात सापडली आहे. MeToo या मोहिमेअंतर्गत त्याच्या विरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. साजिद खानला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून संधी दिल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

त्याच मोहिमेच्या अग्रस्थानी असलेली अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने MeToo आरोपी साजिद खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता तिने महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर तिचा जबाब नोंदवला आहे. इतकचं नाही तर तिने सलमान खानलाही आवाहन केले आहे.

शर्लिनने काल जुहू पोलीस स्टेशनमध्ये तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली मात्र, पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला. 

एएनआयशी बोलतांना ती म्हणाली, 'मला सांगण्यात आले आहे की, ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे माझी केस सोपवण्यात आली आहे, तो उपस्थित नाही. मी त्यांना विनंती केली की मला महिला अधिकाऱ्यासमोर जबाब नोंदवायचा आहे. पण मला सांगण्यात आले. जुहू पीएसआयमध्ये एकही महिला पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित नाही. मला धक्काच बसला. त्यामुळे आता मी पीएसआय महिला पोलीस अधिकारी मेघा यांच्याकडे माझे म्हणणे नोंदवले आहे. ते MeToo आरोपी साजिद खानला मोठी मदत करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे तिने म्हटले आहे. बॉसच्या घरात चौकशीसाठी बोलावणार.असा गुन्हेगार बिग बॉसच्या घरात असणे दुर्दैवी आहे.आम्हाला न्याय हवा असल्याने कारवाई झाली पाहिजे'.

 

यावेळी ती सलमानवरही भडकल्याचे दिसले. सलमान आमची भूमिका का घेऊ शकत नाही असा प्रश्न तिने सलमानला विचारला. तसेच ती म्हणाली जो आपल्या मित्राने अन्याय केलेल्या महिलांच्या दुर्दशेकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो. लोक तुम्हाला भाईजान म्हणतात, तु आमच्या बाजूने भूमिका का घेऊ शकत नाही? तू आमच्यासाठी मोठा भाऊ का होऊ शकत नाहीस? मोलेस्टर, हैबिचुअल ऑफेंडरला तुम्ही तुमच्या घरातून का काढू शकत नाही. आमच्यासाठी ही उदासीनता का? आम्ही सलमान खानच्या घराबाहेर मूकपणे आंदोलन करणार आहोत. आम्ही त्याला 'भाईजान' सारखे वागवतो म्हणून आमच्याबद्दल थोडी सहानुभूती त्याने दाखवावी अशी आम्ही विनंती करतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान सतेज पाटलांची भूमिका स्पष्ट; मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रकांतदादा आणि चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा

IND vs NZ 3rd T20I: टीम इंडियाला Live सामन्यात धक्का, मॅचविनर फलंदाजाने सोडले मैदान; बदली खेळाडू आला, नेमकं काय घडलं?

लाडकी बहीणनंतर 'लाडकी विद्यार्थिनी योजना', ६,००० रुपये मिळणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम; पहिल्या फेरीत मोठी मुसंडी

सोशल मीडियावर २० लाख फॉलोअर्स, गावच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं; युट्यूबरला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT