Big Fraud with tv-film actor mahesh thakur,did mayank goyal cheated 5 crores?  instagram
मनोरंजन

'हम साथ साथ है' फेम महेश ठाकूरला 5 करोडचा गंडा, आरोपी मयंक गोयलचं नाव घेत म्हणाला..

नाटक,टिव्ही,सिनेमा अशा सर्वच माध्यमातून काम केलेला उत्तम अभिनेता म्हणून महेश ठाकूरला ओळखलं जातं पण त्याचा स्वतःचा मोठा बिझनेस देखील आहे.

प्रणाली मोरे

Fraud With Actor Mahesh Thakur: नाटक,टिव्ही,सिनेमा अशा सर्वच माध्यमातून काम केलेला उत्तम अभिनेता म्हणून महेश ठाकूरला ओळखलं जातं. महेश ठाकूर छोट्या पडद्यावर अधिक रमले म्हणून घराघरात त्यांन टी.व्ही अभिनेता म्हणून अधिक ओळखलं जात. ते काही प्रसिद्द मालिकेचा भाग राहिले आहेत. 'हम साथ साथ है' या सिनेमामध्येही त्यांनी अभिनेत्री निलमच्या पतीची भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वी महेश ठाकूरसोबत मोठी फसवणूक झाली आहे. आणि त्यासंदर्भातली तक्रार त्यांनी मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनात केली आहे. रिपोर्ट्सनुसार,ठाकूर यांनी मयंक गोयल नामक व्यक्ती विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप करताना म्हटलं आहे की,मयंक गोयलने त्यांच्याकडून ५.४३ करोड रुपये लुबाडले आहेत. (Big Fraud with tv-film actor mahesh thakur,did mayank goyal cheated 5 crores?)

एका इंग्रजी वेबसाईटनं महेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि यातील सत्यता पडताळून पाहिली तेव्हा अभिनेत्यानं हे खरं आहे असं म्हटलं आहे. महेश ठाकूर यांनी सांगितलं आहे की, ''हा पैशांच्या व्यवहारातला मोठा धोका आहे,आणि यात पोलिस आता तपास करत आहेत त्यामुळे सविस्तर यावर काहीच सांगू शकत नाही. मी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार आहे''. यादरम्यान मुंबई पोलिसांनी IPC Act ४२० आणि ४०६ च्या अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की याचा तपास वेगानं सुरु आहे.

मीडियामध्ये बातमी पसरली होती की ठाकूर यांनी अंबोली पोलिस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल केली होती, पण अभिनेत्याशी संपर्क साधला असता समोर आले की ही तक्रार ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये केली गेली आहे. आता पहायचं की कथित आरोपी मयंक गोयलने ठाकूरांना कसं लुबाडलं आहे,आणि तेही जवळ-जवळ ५ करोडहून अधिक रुपयांना. यासंबधित सर्व खुलासा झाल्यानंतरच खरं काय ते कळेल किंवा ठाकूर पत्रकार परिषद घेणार आहेत तेव्हा खुलासा करतीलच आणि सगळं स्पष्ट होईल.

महेश ठाकूर यांच्या बिझनेस विषयी बोलायचं झालं तर ,क्रिएटिव्ह फ्लाइट नावाचं त्याचं एक फिल्म प्रॉडक्शन हाऊस आहे, जिथे सिनेमे आणि टी.व्ही शो ची निर्मिती केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा थेट प्रक्षेपण

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस, अजमेर शहराला पावसाने झोडपलं

Srirampur Crime:'नशेच्या इंजेक्शनच्या तस्करीवर धडक कारवाई'; श्रीरामपूरमध्ये वाढते जाळे उघडकीस, तरुणाईसाठी धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT