ashok pandit 
मनोरंजन

चित्रीकरणासंदर्भात अशोक पंडित यांनी केले 'हे' मोठे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूमुळे सगळे जनजीवन ठप्प झाले आहे. गेला दीडेक महिना चित्रीकरण बंद आहे. चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन कधी उठेल हे आता काही सांगता येत नाही. सरकारने लॉकडाऊन उठविल्यानंतर जेव्हा सरकारकडून आदेश येईल त्यानंतरच चित्रीकरण सुरू होईल. सरकार तेव्हा काही नियमावली देईल त्यांचे काटेकोर पालन करूनच चित्रीकरण होईल, असे इम्पाचे संचालक अशोक पंडित यांनी सांगितले. प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाची काल एक बैठक झाली. त्या बैठकीत चित्रीकरण सुरू झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना करायच्या...कोणत्या नियमांचे पालन करायचे...आदी बाबींसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. 

त्यानंतर जुलै महिन्यात चित्रीकरण सुरू होईल अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याबद्दल अशोक पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारच्या निर्णयानंतरच चित्रीकरण सुरू होईल असे सांगितले. ते पुढे म्हणाले, की सरकारने चित्रीकरण सुरू करण्याचा निर्णय दिल्यानंतर आमच्या विविध संघटना आहेत. त्यांची बैठक होईल आणि सगळ्यांच्या संमतीने योग्य निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊननंतर जेव्हा चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होईल तेव्हा काही ठराविक आणि कठोर नियम पाळून चित्रीकरण करावे लागणार आहे. यासाठी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाने काही नियम ठरवले आहेत.

जर चित्रीकरण जुलै महिन्यापर्यंत सुरू झाले तर काही नियम पाळूनच चित्रीकरण केले जाऊ शकते. कलाकारांची सुरक्षा लक्षात घेऊनच चित्रीकरण सुरू होईल. अशा वेळी कलाकार आणि अन्य मंडळींना काही गोष्टींचे भान ठेवावे लागणार आहे. चित्रीकरण सुरू होण्याआधी स्वॅब टेस्ट केली जाईल. चित्रीकरणाच्या वेळी सकाळी सेटवर प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. प्रत्येक कलाकाराने आपला मेकअप घरूनच करून येणे,  सेटवर डॉक्टर आणि नर्स असणे गरजेचे आहे. सेटवर येणाऱ्या कामगारांना बारा तासांमध्ये चार मास्क दिले गेले पाहिजेत, पुढील तीन महिन्यांपर्यंत सेटवर ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना एन्ट्री दिली जाणार नाही. असे काही नियम सेटवर पाळावेच लागणार आहेत अशी काहीशी नियमावली प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने ठरविली आहे. परंतु हे सगळे सरकारने चित्रीकरणास परवानगी दिल्यानंतरच होईल.

याबाबत अशोक पंडित यांनी सांगितले, की, कोणतेही चित्रीकरण हे वीस किंवा पंचवीस लोकांमध्ये होत नाही. त्यांच्या मागे बरीच मोठी टीम काम करत असते. सरकार प्रत्येक इंडस्ट्रीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देईल आणि आमचे निर्णय हे सरकारच्या मार्गदर्शन तत्त्वांवर आधारित असतील. याप्रमाणे चर्चा करून आम्ही एका निर्णयावर पोहचू. यासाठी खूप वेळ लागणार आहे. अगदी संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने हे निर्णय घेतले जातील. त्यामुळे जेव्हा सरकार चित्रीकरण सुरू करण्याचा निर्णय घेईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. आमचे निर्णय हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT