Tejaswi Prakash
Tejaswi Prakash Instagram
मनोरंजन

Naagin 6 : बिगबॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश होणार एकता कपूरची नवीन नागिन !

सकाळ डिजिटल टीम

एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी टी. व्ही. सिरीयल नागिन ६ (Naagin 6) बद्दल सोशल मीडिया वर बरीच चर्चा होत आहे. एकता कपूरची 'नागिन' फ्रंचाइजी टेलिव्हीजनवरील सर्वात लोकप्रिय शोज पैकी एक आहे. चाहते या शोच्या प्रत्येक नवीन सीझन ची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात.

अलीकडेच या फ्रँचाइजी च्या सहाव्या सीझन ची घोषणा झाली आहे. या पूर्वी मौनी रॉय (Mouni Roy) ,अदा खान (Adah Khan) ,सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) ,सुरभी चांदना (Surbhi Chandna) ,करिश्मा तन्ना (Karishma Tanna) ,निया शर्मा (Nia Sharma),अनिता हसनंदानी (Anita Hassnandani) यांनी नागिन ची भूमिका चोखपणे पार पाडली होती आणि प्रेक्षकांनी यांना पसंती देखील दर्शवली होती. येणाऱ्या

'स्वरागिनी' (Swaragini) या सिरीयल नंतर तेजस्वी ला खूप 'पॉप्युलॅरीटी' मिळाली. त्यानंतर 'पेहरेदार पिया की' (Pehredar Piya Ki) ,'रिश्ता लिखेंगे हम नया' (Rishta Likhenge Hum Naya), 'सिलसिला' (Silsila)आणि मायथॉलॉजिकल शो 'कर्णसंगिनी' (Karnasangini) अशा अनेक शोज मध्ये ती दिसली आहे. नंतर ति खतरोंके खिलाडी १० (Khatron Ke Khiladi)मध्ये देखील दिसली होती. नागिन ६ ची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु असून या सीझनमध्ये 'सर्वश्रेष्ठ नागिन' शोच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली शत्रूशी लढताना दिसणार आहे.

'सर्वश्रेष्ठ नागिन' मानवतेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या जागतिक संकटाशी लढा देईल. सुधा चंद्रन (Sudha Chandran), उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia)आणि महेक चहल (Mahek Chahal) सारख्या कलाकारांचा समावेश असलेल्या स्टारकास्टसह 'नागिन' चा हा सीझन वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारीला कलर्सवर (ColorsTv) प्रसारीत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT