asim riaz
asim riaz 
मनोरंजन

गुगलवर 'या' सेलिब्रिटीला सर्वाधिक केलं जातंय सर्च 

स्वाती वेमूल

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस'च्या तेराव्या सिझनमध्ये मॉडेल असिम रियाझने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या वादग्रस्त रिअॅलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर असिम सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. त्याच्या फोटो आणि व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळू लागला. आता गुगलच्या यादीत असिमने बाजी मारली आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये असिम पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या आकर्षक शरीरयष्टीमुळे तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेल्या असिमचे इन्स्टाग्रामवर ४.७ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दर दिवसाला ४.८ टक्के लोक असिमला गुगलवर सर्च करतात, अशी माहिती समोर आली आहे. हा आकडा या वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यांचा आहे. असिमचे केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. 

बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये असिम अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. या रिअॅलिटी शोनंतर त्याला बऱ्याच म्युझिक व्हिडीओंची ऑफर मिळाली. त्यापैकी एका व्हिडीओत तो अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत झळकला होता. बिग बॉसमध्येच असिमला त्याचं प्रेम मिळालं. हिमांशी खुराना आणि असिम यांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर फार चर्चेत होती. असिमच्या सोशल मीडियावरील फोटोंवर हिमांशीचे कमेंट्स अनेकदा पाहायला मिळतात. 

आता असिम लवकरच 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याचं कळतंय. या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत रुबिना दिलैक, अभिनव शुक्ला, एरिका फर्नांडिस, सुरभी चंदा, शरद मल्होत्रा, मोहित मलिक हेसुद्धा भाग घेणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT