bigg boss season 15
bigg boss season 15  Team esakal
मनोरंजन

Bigg Boss 15: जाणून घ्या कोणते सेलिब्रेटी होणार सहभागी

युगंधर ताजणे

मुंबई - सलमान खानच्या (salman khan) बिग बॉसच्या (bigg boss) 15 व्यी सीझनची सर्वांना उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याविषयी चर्चा सुरु होती. आता यंदाच्या बिग बॉसमध्ये कोण सहभागी होणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगायला सुरुवात झाली आहे. सध्या बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची (shushant singh rajput) मैत्रीण अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि रिया चक्रवर्ती या सहभागी होणार असल्याची बातमी सुत्रांकडून मिळाली आहे. तसे झाल्यास हा शो पाहणे प्रेक्षकांसाठी आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे. (bigg boss 15 ankita lokhande and rhea chakraborty can be seen together)

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या 15 व्या सीझनची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. यापूर्वीच्या सिझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बिग बॉस म्हटल्यावर त्यात वाद - विवाद, आरोप प्रत्यारोप, भांडणे हे सर्व आलेच.. याबरोबर दर्शकांचे मनोरंजन करण्यात या रियॅलिटी शो नं महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले आहे.

काही माध्यमांनी अशी माहिती दिली आहे की, बिग बॉसच्या येत्या सीझनमध्ये रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर त्याच्या दोन्ही मैत्रीणी अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती चर्चेत आल्या होत्या. पोलिसांनी त्यांच्याकडे तपासही केला होता. याशिवाय ड्रग्जच्या केसेसमध्ये रियाला एनसीबीनं तपासासाठी बोलावले होते. यामुळे बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

स्पॉटबॉयनं दिलेल्या माहितीनुसार, अशी शक्यता आहे की, या दोन्ही अभिनेत्री बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये दिसणार आहे. शो च्या निर्मात्यांनी रियाशी बोलणे सुरु केले आहे. तिनं जर या शो मध्ये सहभागी होण्याला संमती दिली तर तिच्या जोडीला अंकितालाही सहभागी करुन घेतले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT