Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: बिग बॉस करणार धमाका! एक दोन नव्हे तर 'हे' तीन स्पर्धक जाणार घराबाहेर..

या आठवड्यात घरात सुंबूल, एमसी स्टॅन, निम्रत आणि श्रीजीता यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं.

Vaishali Patil

'बिग बॉस 16' हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. या सीझनमध्ये खूप काही खास, वेगळं आणि नवीन झालयं मग ते स्पर्धकांच्या बाबतीत असो किंवा त्याच्या नॉमिनेशनबद्दल.

मागील काही सीझनमध्ये दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यांनी नामांकन व्हायचं मात्र या सीझनमध्ये काही वेगळंच चित्र आहे. बरेच स्पर्धक अजूनही घरीच आहे. गेल्या आठवड्यातही कोणालाही घरातुन काढण्यात आलेले नाही.

मात्र या आठवड्यात चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. श्रीजीता डे ची घरातुन एक्झीट होणार आहे, पण त्याचं बरोबर साजिद खान आणि अब्दू रोजिक यांनाही घरातून बाहेर काढण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा: सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी दोन नाही तर तिन सदस्य घरातुन बाहेर जाणार आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक श्रीजीता डे या आठवड्यात कमी मतांमुळे बाहेर पडणार आहे. पण इथे आणखी एक ट्विस्ट म्हणजे साजिद खानचा करारही आता संपत आहे, त्यामुळे तोही शोमधून बाहेर पडणार असल्याचं बोलले जात आहे. त्याच्यासोबत अब्दु रोजिकही बिग बॉसच्या घराला अलविदा करणार आहे.

घरातील संपूर्ण आठवड्याच्या एपिसोडबद्दल बोलायचं झालं तर शोमध्ये फॅमिली वीक सुरू होता. शिवच्या आईपासून ते प्रियंका चहर चौधरीचा भाऊ घरात आला होते.

शेवटच्या एपिसोडमध्ये सुंबुलचे वडील, श्रीजिताचा बॉयफ्रेंड आणि सौंदर्याच्या आईने एंट्री घेतली. घरात एक कॅप्टनसी टास्कही होता, ज्यात शिव ठाकरे सर्वांना पराभूत करून कॅप्टन झाला. या आठवड्यात एलिमिनेशनही घरातच झाले. या आठवड्यात सुंबूल, एमसी स्टॅन, निम्रत आणि श्रीजीता यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT