Bigg Boss 16 Farah Khan calls Tina Datta and priyanka chahar behaviour 'disgusting' sakal
मनोरंजन

Bigg boss 16: थोडक्यात चोपलं! सलमानची जागा चालवत फराह खानने घेतली टीना- प्रियंकाची शाळा..

सलमान खानऐवजी फराह खानने घेतली बिग बॉसची सूत्रं..

नीलेश अडसूळ

Bigg boss 16: टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा सीझन 16 हा फिनालेपासून अवघे काही दिवस दूर आहे. या सीझनमध्ये कोण विजेता होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

तर दुसरीकडे, बिग बॉस 16 च्या शेवटच्या आठवड्यात, टीना दत्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांनी शालिन भानोतला कसा त्रास दिला हे दिसून आले आहे. यावरूनच आता फराह खान त्या दोघींची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे.

(Bigg Boss 16 Farah Khan calls Tina Datta and priyanka chahar behaviour 'disgusting')

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा


टिना आणि प्रियंका नुकत्याच त्याच्या मानसिक स्थितीवर भाष्य करताना आणि त्याची खिल्ली उडवताना दिसल्या. त्यामुळे या वीकेंडच्या वॉरमध्ये सलमान खानऐवजी फराह खान, टिना आणि प्रियांकाला खडेबोल सुनावणार आहे.

या आठवड्यात सलमान खान वीकेंड का वार होस्ट करणार नाही. त्याच्या जागी फराह खान शो होस्ट करणार आहे. या वीकेंडचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये फराह खान रागात दिसत होती.

या व्हिडिओमध्ये फराह खान, प्रियांका चहर चौधरी आणि टीना दत्ता यांना शालीन भानोटला दिलेल्या त्यांच्या वागणुकीसाठी फटकारताना दिसत आहेत. शालिनला धमकावल्याबद्दल फराहने दोन्ही अभिनेत्रींना खडसावले आहे.

गेल्या वीकेंडच्या वार नंतर , संपूर्ण घराने शालिनपासून स्वतःला दूर केले होते, ज्यामुळे तो एकटा आणि भावनिक झाला होता. तेव्हापासून प्रियांका आणि टीना त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

शालिनने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निमृत आणि सुंबुल सारखे इतर घरातील सदस्य शालीनला सपोर्ट करत आहेत.

टीना दत्ता आणि प्रियांकाला आपली चूक लक्षात न आल्याने ती फराह खानशी वाद घालताना दिसली. या दोन्ही अभिनेत्रींच्या या बोलण्यावर फराह खान संतापली. ती त्यांना ताकीद देते की, 'तुम्हाला माझे ऐकायचे नसेल तर मी बाहेर जाईन.'

शालीनची प्रकृती बिघडली होती. त्याला बिग बॉसच्या घरात मानसोपचारतज्ज्ञांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्याला औषधेही देण्यात आली होती. मात्र, प्रियांका आणि टीना त्याच्या औषधोपचार आणि नैराश्याची खिल्ली उडवतात. याबाबत फराह खान चांगलीच नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT