Shiv Thakare Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Shiv Thakare Video: जेव्हा शिव बिग बॉसच्या स्पर्धकाला चावला! चाहतेचं नव्हे तर बिग बॉसही सपोर्टला..व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये शिव ठाकरेची हवा आहे. तो त्याच्या दिलखूलास स्वभावाने प्रेक्षकांच मन जिंकत आहे. त्याला प्रेक्षकांचंही भरभरुन मतं मिळतं आहे. बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडमधील सर्वात चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 2 मधील शिवचं वागणं...वाईल्ड कार्ड स्पर्धक विकासने याची सुरवात केली.

त्याने शिवाच्या विरोधात घरात अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामूळं प्रकरण इतक वाढलं की शेवटी बिगबॉसलाच शिवच्या बाजूने बोलावं लागलं. त्याच झालं असं की, की विकास अर्चनाला सांगतो की, शिवला तिच्याशी मैत्री करायची आहे, असं केल्यास त्यांला जास्त मतं मिळतील. यानंतर विकासने जुन्या गोष्टी उकरुन काढण्यास सुरुवात केली.

तो अर्चनाला सांगतो की, 'शिव बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये असताना त्याने एका स्पर्धकाला चावा घेतला होता. त्यामूळं बराच गोंधळ झाला होता. त्यानंतर शिव घरात राहिल की नाही हा निर्णय त्या स्पर्धकावर सोडला. त्यावेळी त्याने शिवला माफ केले, परंतु जेव्हा तुझ्याबरोबर असाच प्रसंग घडला तेव्हा त्यानी तुला घराबाहेर हाकलून देण्याचा निर्णय घेतला.' हे ऐकल्यानंतर अर्चना चांगलीच संतापते!

यानंतर विकास हेच प्रियांकाला, टीना आणि शालीन यांच्यासमोरही बोलतो. शिवच्या पुढच्या चालीबद्दलही तो बोलतो. तो म्हणतो की तो भोळा वागत असला तरी आतून सगळा खेळ खेळतो. दुसरीकडे अर्चनाने शिवला विचारते की, 'तुझ्याकडूनही हीच चूक झाली होती, पण तुला माफ करण्यात आलं , पण माझ्यावेळी तू का माफ केलं नाहीस?' यावर शिव स्पष्टीकरण देत असतांनाच बिग बॉसने त्याला अडवतो आणि सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावतो त्यानंतर बिग बॉस विकासची चांगलिचं खरडपट्टी काढतो.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

दरम्यान आता शिवचा तो जूना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो टास्कदरम्यान इतर स्पर्धकांना चावतांना दिसत आहे. मात्र शिवचे चाहते शिवला पाठींबा देतांना दिसताय. सध्या शिव ठाकरे ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. बिग बॉसने तत्काळ विकासला थांबवून फटकारल्याने शिवचे चाहते खूश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

SCROLL FOR NEXT