Bigg Boss 16 MC Stan Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: एमसी स्टॅन शोमध्ये नाही तर बिग बॉस पाहणार नाही!

ट्विटरवर #MCStan ट्रेंड करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

एमसी स्टेन सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. त्यांची फॅन फॉलविंग काही कमी नाही. त्याला वाचवण्यासाठी आता चाहते जमा झाले आहेत. त्याला शोमधून बाहेर काढू नये अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. यासाठी ट्विटरवर #MCStan ट्रेंड करत आहे. त्याचे चाहते म्हणतायं की ते फक्त आणि फक्त MC Stan मुळेच शो बघतात. एमसी स्टेन कमी बोलत असला तरी तो सॉलिड बोलतो, असं काहीजण म्हणत आहेत. त्याचे वन लाइनर्स हे गजब असतात. याशिवाय त्यांची शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्याशी असलेली मैत्री आणि सुंबुल तौकीर खान यांच्यासोबतची बॉन्डिंगही चांगलीच गाजली आहे.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

खरं तर एमसी स्टॅनलाच स्वतः बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळेच तो काही दिवसांपूर्वी एक्झिट गेटजवळ झोपला होता, जेणेकरून कोणीतरी त्याला बाहेर काढू शकेल. मात्र, एमसी स्टेनच्या या मजेदार कृत्यावर बिग बॉसनेही त्याची चेष्टा केली होती.

मागच्या भागात, नॉमिनेटेड सदस्यांची घोषणा होताच, सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती तिथे एमसी स्टेनच्या चेहऱ्यावर बाहेर जाणार याचा आंनद दिसत होता. या शोमध्ये त्याचं खेळून झालयं त्याला खोटया लोकांसोबत राहायचं नाही. हा शो त्यांच्यासाठी नाही. असंही तो अनेकदा म्हणाला आहे.

मात्र, त्याच्या चाह्त्यांना त्याला शोमध्ये पहायचं आहे. त्यामूळे ते त्याला घरात ठेवण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. त्याच्या नावाचा नवीन ट्रेंडच त्यांनी सुरु केला आहे. त्याच्या माध्यमातून ते स्टॅनला पाठिंबा देत आहे. त्यामूळे स्टॅनच्या चाहत्यांमूळे तो घरात टिकू शकतो की त्याला घराबाहेर जावे लागते हे लवकरच समजेलं. कलर्स चॅनल आणि Voot अॅपवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार-रविवार रात्री 9 वाजता तुम्ही या शोचे एपिसोड पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT