Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: अर्चना-स्टॅनच्या वादावरुन शिव अन् प्रियंकात राडा...

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 16 चा फिनाले जवळ आला आहे. दिवसेंदिवस हा शो अजून आक्रमक होत चालला आहे. घरातील सदस्य आता एकमेकांवर धावून जात आहे. घरामध्ये एकीकडे मंडळी दुसरीकडे प्रियंका आणि अर्चना असं चित्र पहायला मिळतं आहे.

गेल्या एपिसोडमध्ये टीना दत्ताला घरातून बाहेर काढण्यात आले. आता प्रियंका आणि शिव मध्ये जबरदस्त भांडण झालं आहे.

तर सोशल मीडियावर वीकेंड का वारची होस्ट बनलेल्या फराह खानला प्रियंका चहर चौधरीच्या चाहत्यांकडून ट्रोल केले जात आहे. त्याचवेळी शोचा नवा प्रोमो समोर आल्यानंतर प्रियांकाच्या चाहत्यांचा राग वाढत चालला आहे, त्यामुळे आता शोचा स्पर्धक शिव ठाकरे यांना ट्रोल केलं जात आहेत.

बिग बॉस 16 च्या आगामी भागाचा प्रोमो कलर्सने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. टीना दत्ता घरा बाहेर पडल्यानंतर प्रियांका आणि अर्चना एकत्र आल्याचे प्रोमो व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रियांका शिव ठाकरे आणि एमसी स्टेनसोबत भांडताना दिसत आहे. अर्चना एमसी स्टेनला बोलते " प्रामाणिकपणा आहे की नाही तर स्टेन अर्चनाला बोलतो तु तुझा इमान‌ विकून आली आणि मला बोलते..मला शिकवणार का? तर अर्चना स्टॅनला निघायला सांगते.

तर दुसरीकडे या भांडणात प्रियंका पडते आणि बोलते 'गंदी चाले करते हो सारे के सारे' म्हणते, तर शिवला ते सारे के सारे हे ' साले' एकू येत. तर तिच्या या बोलण्यावर शिव संतापतो. संयम असलेला शिव ठाकरे रागावर नियंत्रण गमावून बसतो आणि प्रियांकाच्या मागे धावताना दिसत आहे.

त्यामुळं आता पुन्हा घरातील स्पर्धकांमध्ये हाणामारी होईल असं चित्र दिसत आहे. आता बिगबॉसच्या घरात अजून काय काय राडे होतील हे तर आगामी भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT