Bigg Boss 16 Sumbul Taukeer Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: बिग बॉसने दिला सुंबुलला जोराचा दणका..

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16' मध्ये येत्या काही दिवसांत खूप ड्रामा आणि बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत, मात्र येत्या एपिसोड्समध्ये बिग बॉसचा 'इमोशनल अत्याचार' घरातील सदस्यांवर होणार आहे.

एकीकडे, बिग बॉस सदस्यांना त्यांच्या नातलगांची पत्रे देऊन आमिष दाखवताना दिसतील, तर दुसरीकडे, टास्क दरम्यान, तो त्यांच्या राशनच्या वस्तू एक एक करून हिसकावून घेणार आहे. बिग बॉसच्या वाढत्या टीआरपीमुळे, शो 5 आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

मात्र यावेळी घरीतील तगडी स्पर्धक म्हणजेच सुंबुल तौकीरला बिग बॉसने दणका दिला आहे. सुंबूल तिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे घरातील सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक होती. मात्र ती सुरवातीला घरातील एक कमजोर स्पर्धक वाटली असली तरी तिने आता तिच्या खेळात बराच सुधार केला आहे.

आता ती तिचं लक्ष खेळावर केंद्रींत करत आहे. मात्र आता अशी बातमी समोर आली आहे की निर्मात्यांनी तिच्याकडून शोचा टीआरपी वाढण्याचीही अपेक्षा होती, परंतु तिच्या कडून शोला तेवढा फायदा होऊ शकला नाही त्यामूळं निर्मात्यांनी सुंबुलची फी 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपोर्ट्सनुसार, सुंबुलला दर आठवड्याला फी म्हणून 12 लाख दिले जात होते. आता ते 6 लाखांवर आले आहे, जी अजूनही बरीच आहे. बहुतेक वेळा असं घडलयं की शो जसजसा फिनालेच्या जवळ येतो तसतसं स्पर्धकांची फी वाढवली जाते, पण हे पहिल्यांदाच घडत आहे जेव्हा एखाद्या स्पर्धकाची फी कमी केली आहे. सुंबुल बद्दल बोलायचं झालं तर ती एक मजबूत स्पर्धक आहे आणि ती अनेकदा आवाज उठवत असते. घरची कॅप्टन बनण्यातही ती यशस्वी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT