bigg boss 16 shiv thakare said I had 169 girlfriends so far sakal
मनोरंजन

bigg boss 16: काय! 169 गर्लफ्रेंड.. शिव ठाकरेचा अजब खुलासा, म्हणाला..

सध्या बिग बॉस हिंदीमुळे शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शो मध्ये सध्या त्याची अनेक गुपितं उघड होत आहेत.

नीलेश अडसूळ

shiv thakare: बिग बॉस मराठी सिजन २ चा विजेता शिव ठाकरे नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. सध्या तो हिंदी बिग बॉसच्या 16 व्या पर्वात सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच त्याने सगळ्यांची मनं जिंकली. शिवनं पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. शिवचा खरेपणा अनेकांना भावतो. पण या खरेपणाच्या नादात त्याने भलताच खुलासा केला आहे. आजपर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड झाल्या आहेत, असं तो बिग बॉस 16 च्या घरात जाण्याआधी झालेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे.

शिव ठाकरे हे नाव काही महाराष्ट्राला नवीन नाही. बिग बॉस मराठी मधून तो घराघरात पोहोचला. आणि अर्थातच घराघरात पोहोचलं ते त्यांचं आणि अभिनेत्री वीणा जगताप हिचं नातं. बिग मध्ये जुळलेलं त्यांचं प्रेम घरात तर दिसलंच पण घराबाहेरही बराच काळ सुरू होतं. पण काही कारणांमुळे त्यांचे नाते फार काल टिकू शकले नाही. आता त्याने आपल्या आयुष्यातील प्रेमा विषयी मोठा खुलासा केला आहे. 'माझं आयुष्य हे ओपन बुक आहे..'असं म्हणत शिवनं बिग बॉस 16मध्ये अनेक गुपितं उलगडली.

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी झालेल्या मुलाखतीत शिवनं अनेक गोष्टी सांगितल्या. त्याला 169 गर्लफ्रेंड होत्या असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. तो म्हणतो, 'मी माइंडनं खूप क्लिअर आहे. माझं आयुष्य ओपन बुक आहे. माझ्या आयुष्यातील कोणत्याच गोष्टी मी लपवून ठेवल्या नाहीत. माझ्या 169गर्लफ्रेंड पासून मी सगळं काही बिग बॉसमध्ये (bigg boss) सांगितलं आहे. माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडबरोबर काय बोलणं झालं, कोणाला सप्राइज केलं, सगळं मी सांगितलं आहे. माझं पुस्तक खुलं आहे. (shiv thakare)तुम्ही मला काहीही विचारा मी सहज उत्तर देईन'.

शिवचा हा खरेपणा सगळ्यांनाच आवडला आहे. पण त्याच्या 169 गर्लफ्रेंडसची देखील चर्चा होत आहे. बिग बॉस हिंदीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सलमान खाननंही शिवचं कौतुक केलं. त्यामुळे हिंदी बिग बॉसही शिव ठाकरे गाजवणार अशी प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना खात्री वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT