Bigg Boss 16 esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: 'तुला लाज वाटायला पाहिजे', बिग बॉसमधील राड्याला सुरुवात

अजुन बिग बॉसला सुरुवातच झाली असताना त्यांचा टोकाचा वाद हा मात्र नेटकऱ्यांची पसंती मिळवताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉसच्या 16 व्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. त्याच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या प्रोमोतून यंदाचा सीझन देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार असल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडीचा रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. आज मराठी बिग बॉसला देखील सुरुवात होणार आहे. हिंदीतील बिग बॉसचे होस्टिंग बॉलीवूडचा भाईजान सलमान खान तर मराठीतील बिग बॉसच्या होस्टिंगची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे आहे.

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस हिंदीमधील वाद समोर आला आहे. त्यामध्ये काँग्रेस नेता अर्चना गौतम आणि तजाकिस्तानच्या अब्दु राजिक यांच्यातील तू तू मैं मैं ही नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे. अजुन बिग बॉसला सुरुवातच झाली असताना त्यांचा टोकाचा वाद हा मात्र नेटकऱ्यांची पसंती मिळवताना दिसतो आहे. सोशल मीडियावर अर्चनाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्चनानं राझिकला केलेली असभ्य शब्दांतील टीका ही नेटकऱ्यांना आवडलेली नाही.

सोशल मीडियावर बिग बॉसच्या 16 व्या पर्वाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. गेला सीझन देखील कमालीचा उत्कंठावर्धक झाला होता. त्यानं सर्वाधिक टीआरपी मिळवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आता या नव्या सीझनमध्ये पहिल्या एपिसोडपासूनच स्पर्धकांमध्ये कमालीची चुरस असल्याचे दिसून आले आहे. अर्चनाला मिस बिकीनी असं म्हटलं जातं. ती सोशल मीडियावर आता ट्रोल होताना दिसत आहे. कॉग्रेस पक्षाशी संबंधित असणाऱ्या अर्चनाचा चाहतावर्ग मोठा आहे. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते.

झालं असं की, अर्चनानं अब्दु रासिकची थट्टा मस्करी केली. मात्र ती करताना तिनं पातळी सोडली. आणि 19 वर्षांचा अब्दु हा चाहत्यांचा चर्चेचा विषय आहे. अर्चनानं त्याला त्याच्या उंचीवरुन डिवचण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र तिनं बोलण्याची पातळी सोडून त्याच्यावर ज्या कमेंट केल्या त्याची आता सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यावर नेटकऱ्यांनी अर्चनाला तुला लाज वाटायला पाहिजे अशी कमेंट करुन तिच्यावर राग व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

"दागिन्यांच्या जाहिरातीत माझ्यासारख्या मुलीला.." प्रियदर्शिनीच्या बहिणीची रवी जाधव यांच्यासाठी भावूक पोस्ट

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

अल्पवयीन मुलींना गर्भपातास परवानगी, पण बाळाला जन्म दिल्यास काय होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Why Acidity Suddenly Increases : उन्हाने पोट दुखतं, पित्ताशयात खडे तर नाहीत ना? ॲसिडिटीचाही होतोय त्रास? कडक उन्हाळ्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT