Shalin Bhanot calls soundarya sharma and archana gautam lesbians latter replies wisely bigg boss 16 Google
मनोरंजन

Bigg Boss 16: शालीननं 'लेस्बियन' म्हटल्यानं पेटून उठली अर्चना..अभिनेत्याच्या मुलाला वादात ओढत म्हणाली..

अर्चना आणि सौंदर्या एकाच चादरीत झोपतात म्हणजे त्या लेस्बियन आहेत असं शालीननं म्हटल्यानं अर्चनानं अख्खं घर डोक्यावर घेतलं.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16: वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १६ च्या नव्या भागात स्पर्धक आता आपापल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहेत आणि आपल्याच जवळच्या सहकाऱ्याला घराबाहेर काढण्यासाठी सापळा रचायचं काम करतायत. त्यासाठी अर्थात ते नॉमिनेशनचा मार्ग स्विकारत आहेत.

नवीन वर्षाची संध्याकाळ तर शालीन भनोट आणि टीना दत्ताच्या रोमॅंटिक डान्सनं चांगलीच चर्चेत राहिली..कारण यानंतर दोघांनाही 'फेक' म्हणून नावं ठेवली गेली. (Shalin Bhanot calls soundarya sharma and archana gautam lesbians latter replies wisely bigg boss 16)

आता या सगळ्यानंतर घरात एका नव्या वादानं पेट घेतला आहे. कारण अर्चना-सौंदर्यानं शालीनला त्याच्या आणि टीनामधील नात्यावरनं प्रश्न केले तेव्हा खवळलेल्या शालीननं त्या दोघींना थेट 'लेस्बियन' म्हणत हिणवलंय..मग काय महाभारत तर घडणारंच होतं.

शालीन भनोट आणि टीनामधलं नातं 'फेक' आहे असं अर्चना गौतमनं म्हटल्याबरोबर शालीननं तिला, ''सौंदर्यासोबत तुझं नातं काय?,लेस्बियन आहात का तुम्ही? कारण एकाच चादरीत झोपता तुम्ही..'' असा थेट सवाल केला. यावरनं बिग बॉसचं घर अख्खं पेटून उठलं. अर्चना-सौंदर्यानं मोठा राडा घरात घातला.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

जेव्हा शालिननं अर्चना-सौंदर्याला लेस्बियन म्हटलं तेव्हा तर अर्चनाची तळपायाची आग मस्तकात गेली. शालीनचं म्हणणं आहे की तो आणि टीना खूप चांगले मित्र आहेत, घट्ट मैत्री असली की यांच्यात काहीतरी सुरु आहे असाच अर्थ का काढला जातो? असं असेल तर मग अर्चना आणि सौंदर्याही लेस्बियन असू शकतात. यानंतर अर्चनानं पलटवार करत म्हटलं की तिला पुन्हा 'जेंडर बायस्ड' म्हटलं जात आहे. अर्चनाच्या मनाला शालीनचं हे बोलणं इतकं टोचलं की तिनं शालीनला यासाठी तुझे शब्द परत घे नाहीतर..असा धमकीवजा इशाराही दिला.

त्यानंतर सौंदर्या आणि अर्चनानं पूर्ण घटना निमृतला देखील सांगितली. निमृतने शालीनला 'चीप' म्हटलं..आणि म्हणाली,''हा दिवसेंदिवस याची मर्यादा ओलांडतोय''. तेव्हा अर्चना म्हणाली,''याचा मुलगा शाळेत जात असेल तेव्हा तिथे चर्चा होत असेल..त्या मुलाला म्हणत असतील,याचा बाप बिग बॉस मध्ये काय करतोय पहा?'' आता सलमान यावर काय म्हणतोय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT