Rupali Bhosle angry Ankita Lokhande  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: सारखं सुशांतचं नाव घेऊन सहानुभूती कशाला? रुपाली भोसले अंकीतावर भडकली

'आई कुठे काय करते' आणि 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनची स्पर्धक अभिनेत्री रुपाली भोसले हिने अंकितावर टीका केली आहे.

Devendra Jadhav

Rupali Bhosle angry on Ankita Lokhande: सध्या टिव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस 17 प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र घरात स्पर्धकांमध्ये जोरदार वादही पहायला मिळत आहे. एकीकडे अंकिता आणि विकीच्या नात्यात दुरावा आला आहे तर दुसरीकडे घरात कॅप्टन्सी टास्क दरम्यान खूप गोंधळ झाला आहे.

नील भट्ट, अनुराग डोवाल आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यासोबत अंकिता लोखंडेचेही नाव नॉमिनेशन टास्कमध्ये दिले आहे.

त्यामुळे आता अंकिता लोखंडे स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्कनंतर ज्यानंतर घरातील सर्व सदस्य अंकितावर रागावले आणि अंकिताच्या विरोधात गेले आहे.

त्यातच नेटकऱ्यांनीही अंकितावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरात पक्षपातीपणा केला जात असं म्हटलं जात. मात्र आता नेटकऱ्याबरोबरच 'आई कुठे काय करते' आणि 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनची स्पर्धक अभिनेत्री रुपाली भोसले हिने देखील अंकितावर टीका केली आहे.

रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अंकितावर टीका केली आहे. की आपल्या पोस्टमध्ये लिहिते, अंकीता तू पहिल्या दिवसापासूनच सांगतेस की मी स्वतंत्र खेळतेय. की स्ट्राँग आहे. करण जोहर तुझ्याबद्दल जे म्हणाले ते एकदम परफेक्ट आहे.

जर तू स्वतःला स्ट्राँग म्हणवतेस तर प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशन टास्क झाल्यावर तू सुशांत सिंग राजपूतचं नाव का घेतेस? आणि ते सुद्धा या खेळात? तुला सुशांत सिंग राजपूतच्या फॅन्सकडून सहानुभूती मिळून मतं मिळवायची आहेत का? जर तू स्वतःला स्ट्रॉंग म्हणवतेस तर ते सिद्ध कर आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचा वापर करु नको.

जेव्हा विकेंड का वारमध्ये सलमान खानला मुनव्वरने सांगितलं की अंकीता वारंवार तिच्या पुर्वायुष्यात घडलेल्या घटनांचा उल्लेख करते. आता जे झालं ते झालं. हे ऐकताना तू Sarcastically प्रतिक्रिया दिलीस. म्हणजे तू जेव्हा काही गोष्टी करतेस तेव्हा लोकांनी तुला बिचारी म्हणावं आणि इतर लोकं जेव्हा करतात तेव्हा ते व्हिकटीम कार्ड प्ले करतात. वा रे वाह!

आता रुपालीची पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आहे. नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर अनेकांना तिचे म्हणणे पटले आहे. तर आता बिग बॉस 17 मध्ये कोणत्या स्पर्धकाता प्रवास या आठवड्यात संपतो हे या 'विकेंड का वार' मध्ये कळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT