Ankita Lokhande- Vicky Jain Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: अंकिता अन् विकी घेणार घटस्फोट? बिग बॉसच्या घरात संपणार नातं?

सर्वात लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे चर्चेत आले आहेत.

Vaishali Patil

Ankita Lokhande Vicky Jain:  टिव्ही विश्वातील लोकप्रिय शो बिग बॉसचा सध्या 17 वा सिझन सुरु आहे. एकीकडे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे तर दुसरीकडे या सिझनवर खुप टीका केली जात आहे.

घरातील प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा सुरु असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच आता मुनव्वर फारुकी देखील यंदाच्या आठवड्यात खुपच चर्चेत आला. त्याच्या दोन गर्लफ्रेंडने त्याच्यावर अनेक आरोप केले होते.

मात्र आता घरातील दुसरी सर्वात लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे चर्चेत आले आहेत. घरात गेल्यापासून दोघांमध्ये खुपच भांडण होत आहे. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. आयशा खानने विकीला त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारले अन् विकीने त्याला विनोदी उत्तर दिले आणि तिला विवाहित पुरुषांना खुप त्रास असतो असे सांगितले.

हे ऐकल्यानंतर अंकिता चिडली आणि तिने विकीला असं बोलण्या मागचं कारण विचारलं याला उत्तर देताना विकी म्हणाला, ' मला कसं वाटत आहे हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित पुरुष कोणत्या परिस्थितीतून जात असतो. काय सहन करत असतो हे ते कधीच बोलू शकत नाहीत.'

हे ऐकल्यानंतर अंकिता आणखी भडकली. तिने रागाने विकीला घटस्फोटासाठी विचारले. यावेळी ती म्हणाली, 'तुला एवढा त्रास होत असेल तर तू माझ्यासोबत का आहेस? चल घटस्फोट घेऊ, मला तुझ्याबरोबर घरी परत जायचं नाही.'

नंतर अंकिता आयशासोबत तिच्या आणि विकीच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाली की, 'मला माहित आहे की, विकी माझ्यावर प्रेम करतो पण तो मला जे हवं आहे ते कधीच देत नाही. तो माझ्यावर कंट्रोल करतो असं मला वाटतं. मी पाहिलं आहे की, जेव्हा मी इतर पुरुष स्पर्धकासोबत भांडते तेव्हा तो मला थांबवत असतो.'

सध्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची सोशल मिडियावर खुपच चर्चा आहे. नेटकरी त्यांना या शो मधून बाहेर पडून आपलं नातं वाचवण्यचा सल्ला देत आहे. तर अनेकांनी अंकिताला पाठिंबा दिला आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले. या दोघांनी यावर्षी ऑक्टोबरमध्ये बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉसच्या घरात नेहमी दोघे भांडण करताना दिसतात. आता बिग बॉसच्या घरात त्याचे नाते घट्ट होते की तूटते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT