Bigg Boss 17 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: कुठे राडा तर कुठे मस्ती! विकेंड का वार खान ब्रदर्सने गाजवला तर कुणावर लटकली नॉमिनेशनची टांगती तलावार

'बिग बॉस 17' मधील वीकेंड का वार नंतर आता सलमान खानचे भाऊ अरबाज आणि सोहेल यांनी स्पर्धकांना मोठा धक्का दिला आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 17 Nominations:  'बिग बॉस 17' सुरु होऊन आता बरेच दिवस झाले आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये अनेक चढ उतार पहायला पहायला मिळाले आहे. काही दिवसांपुर्वी घरात ओरीची एंट्री झाली होती. मात्र तो फक्त विकेंडसाठीच घरात आला होता. आता पुन्हा 'बिग बॉस 17'च्या घरात नवा पाहूणा आला आहे. तो म्हणजे 'ऑरा' .

या विकेंडच्या वारमध्ये सलमान खानचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान पुन्हा एकदा स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसले. एकीकडे नील आणि ऐश्वर्या दोघांमध्ये वाद झाला. तर वाइल्ड कार्ड ऑराने पहिल्या दिवसापासून बिग बॉस खळबळ उडवली आहे.

यंदाच्या वीकेंड का वारमध्ये, अरबाज खान आणि सोहेल खानने विकी जैनला सांगितले की, तू असा माणूस आहेस जो संपूर्ण घर चालवत आहे, त्यानंतर अनुराग आणि समर्थने ऑरासोबत डान्स केला. तर सोहेल आणि अरबाजने रिंकूला 'हुशार आंटी'चा टॅग केले.

तर दुसरीकडे अरुण आणि विकीमध्ये ड्युटीवरुन चांगलाच वाद झाला. यात अरुणने विकीला पल्टू म्हटलं तर विकीने अरुणला चुगली असा टॅग देत एकमेकांची खिल्ली उडवली.

बिग बॉसच्या घरात पहाटेपासूनच वाद सुरू झाले होते. ऐश्वर्या शर्मा आणि अंकिता लोखंडे यांच्यात भांडण झाले तर नंतर ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्यातही भांडण पाहायला मिळत आहे.

तर सना खाननंतर या आठवड्यात विकी जैन, खानजादी, अभिषेक कुमार आणि नील भट्ट यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. नील भट्ट हा संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट झाला आहे तर विकी, खानजादी आणि अभिषेक यांना घरातल्या स्पर्धाकांनी नॉमिनेट केले आहे. त्यामुळे आता घरातून कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT