Dharmendra to join Salman Khan on Bigg Boss 17  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: धर्मेंद्र अन् सलमानचा 'जमाल कुडू'वर भन्नाट डान्स! बॉबी देओलही पडेल फिका; व्हिडिओ व्हायरल

सलमान खानसोबत घरात धर्मेंद्र, मिका सिंग, सोहेल खान आणि अरबाज खान शोमध्ये दिसले.

Vaishali Patil

Dharmendra to join Salman Khan on Bigg Boss 17: मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो 'बिग बॉस 17' गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता हा शो फायनलकडे वळत आहे. तर घरातही चांगलाच राडा पहायला मिळत आहे. एकीकडे अंकिता अन् विकी तर दुसरीकडे मुनव्वर आणि आयशा यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे.

तर या आठवड्यातील विकेंड का वार देखील चांगलाच चर्चेत राहिला. सलमान खानने आयशाला फटकारले त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. तर आता रविवारी नवीन वर्षाच्या आधी सलमान शोमध्ये धमाल मस्ती करताना दिसला.

यावेळी सलमान खानसोबत घरात धर्मेंद्र, मिका सिंग, सोहेल खान आणि अरबाज खान देखील दिसले. इतकच नाही तर या सर्वांनी बॉबी देओलच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील लोकप्रिय गाणे जमाल कुडूवर तुफान डान्सही केला.

'बिग बॉस 17'च्या निर्मात्यांनी सोशल मीडिया नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात धर्मेंद्र, मिका सिंग, सोहेल खान आणि अरबाज खान सलमान खानसोबत जमाल कुडू या व्हायरल गाण्यावर सलमान खानसोबत डान्स करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांचा या व्हिडिओला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

या व्हिडिओत धर्मेंद्र सलमान खानसोबत नाचताना दिसतात. धर्मेंद्र यांनी आधी ग्लास डोक्यावर ठेवला आणि नंतर तो तोंडाशी धरून तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धर्मेंद्र यांनी तळहातावर ग्लास ठेवला तर सलमान डोक्यावर ग्लास ठेवून नाचताना दिसला.

तर कलर्स टीव्हीने शेयर केलेल्या दुसऱ्या प्रोमोत समर्थ हा धर्मेंद्र यांची मिमिक्री करताना दिसला. सलमान खानने समर्थ जुरेलला धर्मेंद्रची मिमिक्री करण्यास सांगितले. हे ऐकून समर्थला धक्का बसतो पण नंतर तो धर्मेंद्र यांची नक्कल करतो. समर्थ मिमिक्री करुन सर्वाना हसवतो. मात्र नंतर तो धर्मेंद्र यांची माफीही मागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT