मनोरंजन

नवीन वर्षात बिगबॉसच्या घरातून दोन स्पर्धक आऊट! कुणाला दाखवला सलमानने बाहेरचा रस्ता

आयशा या आठवड्यात घराबाहेर जाईल अशी चर्चा असतानाच बिग बॉसच्या घरात डबल एविक्शन झाले आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 17 Double Elimination: यंदाचा बिग बॉसचा सिझन भलताच चर्चेत आला आहे. 'बिग बॉस 17' कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे कधी स्पर्धकाच्या भांडणामुळे तर कधी घरातील स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. त्यातच सध्या आयशा आणि मुनव्वर देखील खुप चर्चेत आहेत. आयशा या आठवड्यात घराबाहेर जाईल अशी चर्चा असतानाच बिग बॉसच्या घरात डबल एविक्शन झाले आहे. मात्र यात आयशाचे नाव नसून घरातील दोन तगडे स्पर्धक घरातून बाहेर गेले आहेत.

'बिग बॉस 17' च्या घरात काल रात्री पहिले डबल एविक्शन झाले. यात सलमान खानने नील भट्ट आणि रिंकू धवन यांचे नाव घेतले. त्यामुळे नील भट्ट आणि रिंकू धवन यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.

बिग बॉसच्या घरात खूप राडे केल्यानंतर सलमान खानने रिंकू धवनला घराबाहेर जाण्यास सांगितले होते. रिंकू धवन घराबाहेर जाण्याच्या बातमीने घरातले सगळे भावूक होतात. मुनव्वरही रडायला लागतो.

या आठवड्यात नील भट्ट, रिंकू धवन, आयशा खान आणि अभिषेक कुमार वीकेंड का वार मध्ये नॉमिनेट झाले होते. त्यात रिंकूला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले. त्यानंतर बिग बॉसने नीलचे नाव घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता.

आता नीलने घरातून बाहेर पडल्यानंतर घरातल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. मुनव्वर, आयशा आणि मन्नारा यांच्यावर भाष्य करताना नील म्हणाला, “मला वाटत नाही की मुनव्वरचे वैयक्तिक आयुष्य टेलिव्हिजनवर दाखवणे योग्य आहे."

'बिग बॉस 17' कोण जिंकणार याबद्दल विचारले असता नील म्हणाला, "जर मुनव्वर किंवा अभिषेक यांनी त्याचा खेळ जरा सुधरवला तर ते हा शो जिंकू शकतात."

आता बिग बॉसच्या घरात ओरी, अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, आयशा खान, अनुराग डोवाल, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे स्पर्धक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela : २०२७ चा कुंभमेळा महाराष्ट्राचे 'ब्रँडिंग'! मुख्य सचिव राजेशकुमार यांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश

Daulat Sugar Factory : दौलत-अथर्व कामगार प्रश्नातून हलकर्णीत दोघांना बेदम मारहाण, 'स्वाभिमानी'च्या माजी तालुकाध्यक्षांची कार फोडली

Latest Marathi Breaking News Live: मातोश्री परिसरात ड्रोनमुळे खळबळ!

IND vs AUS, Video: T20I मालिका विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण, 'या' खेळाडूने जिंकलं Impact Player मेडल

Phone Tips: फोन 100 % चार्ज करण्याची सवय ठरु शकते घातक, जाणून घ्या तोटे

SCROLL FOR NEXT