Bigg Boss 17 Abhishek Kumar Vs Samarth Jurel  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉस घर आहे की कुस्तीचा आखाडा! ओरा- आयशानंतर अभिषेकची सटकली! थेट हाणामारीच

'बिग बॉस'चं घर आता कुस्तीचा आखाडा बनला आहे. घरातील सदस्य एकमेकांशी भांडत आहे. इतकच नाही तर आता घरात हाणामारी सुरु झाली आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 17: बिग बॉस 17 जस जसा फिनालेकडे वळत आहे तस तसं घरात दररोज नवनीवन ड्रामा पाहायला मिळत आहे. आयशा आणि मुनव्वरचं प्रकरण शांत झालं असतानाच आता दुसरीकडे अभिषेक आणि ईशा-समर्थ यांच्यात राडे सुरु झाले आहे. यापुर्वी घरातील स्पर्धक ओरानं आयशा खानवर हल्ला केला होता त्यानंतर ओरा आणि आयशा यांच्यातही वाद झाला.

तर दुसरीकडे अभिषेकने बिग बॉसच्या घरात हाणामारी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ओरा अन् आयशाचे प्रकरण पूर्णपणे शांत झाले नाही तेच दुसरीकडे अभिषेकने समर्थ जुरैलच्या कानाखाली मारली. समर्थने धक्काबुक्की केल्यानंतर हा वाद वाढला.

इशा मालवीय आणि समर्थ दोघेही अभिषेकला चिडवत होते. दोघांनीही त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल वाईट साईट कमेंट केल्याने हा वाद वाढला. इशाने अभिषेकला चिडवले आणि त्याला बिग बॉसच्या घरातली टिव्ही तोडण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी अभिषेकने शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्याचा ईशाशी वाद आणखी वाढला तेव्हा त्याने मधेमधे बोलत असलेल्या समर्थला चापट मारली. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

काही नेटकरी अभिषेकवर टीका करत आहेत तर अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे. समर्थ आणि इशाने मुद्दाम अभिषेकला भडकवले आणि त्याला हाणामारी करण्यास प्रवृत्त केल्याचे बोलत बिग बॉसने त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.

केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलेब्सही अभिषेकचे कौतुक करत त्याला पाठिंबा देत आहेत. रितेश देशमुख, प्रिन्स नरुला यांनी अनेकदा अभिषेकला पाठिंबा दिला आहे. तर आता पुन्हा रितेश देशमुखने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत अभिषेकचे कौतुक केले होते.

इशा मालवीय आणि समर्थ जुरेल अभिषेक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. इशा आणि समर्थ अभिषेकशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करत आहेत. त्यामुळे आता बिग बॉस आणि सलमान खान या घटनेनंतर काय शिक्षा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT