Bigg Boss 17 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉसनं घरातल्या मंडळींना दिला 'जोर का झटका'! 'या' स्पर्धकाचा पत्ता झाला कट..

बिग बॉसने एका स्पर्धकाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 17 contestants evicted: बिग बॉस चा 17 वा सिझन हा दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. सध्या घरात प्रेम, वाद आणि राडा सर्वच पहायला मिळत आहे. आता घरातील सदस्यांचा पत्ताही कट होत आहे. काही दिवसांपुर्वी घरातून मनस्वी ममगई आणि सोनिया बन्सल यांना बाहेर काढण्यात आले आहे.

तर मागील आठवड्यात दिवाळी पार्टीमुळे शोमध्ये एलिमिनेशन झाले नाही. तर आता दिवाळी सेलिब्रेशननंतर बिग बॉसने घरातील स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनी धक्का दिला आहे. या आठवड्याच्या मध्येच बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाला बाहेर काढण्यात आले आहे. यासोबतच बिग बॉसने घरातून बाहेर काढण्यात आलेल्या स्पर्धकाचे नाव देखील जाहीर केले.

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, बिग बॉसने विकी जैन, सनी आर्या, अरुण महाशेट्टी, सना रईस खान आणि अनुराग डोवाल यांना दिमागच्या घरातील तीन स्पर्धकांची नावे विचारली. या स्पर्धकांनी तीन स्पर्धकांना नॉमिनेट केलं ज्यात नवीद सोल, जिग्ना व्होरा आणि रिंकू धवन यांच्या नावाचा सामावेश होता.

बिग बॉसने नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि खानजादीला नावेद, जिग्ना आणि रिंकू यापैकी एका स्पर्धकाचे नाव विचारल्यानंतर त्यांनी नवीद सोलचे नाव घेतले. त्यानंतर नवीद सोलचा घराबाहेर काढण्यात आले. नवीदचा 'बिग बॉस 17' च्या घरातील प्रवास संपला.

नवीद सोलला सलमान खानच्या सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' मधून बाहेर काढण्यात आले आहे. नवीद सोल आता शोमधून बाहेर पडणारा तिसरा स्पर्धक बनला आहे. मात्र स्पर्धक नवीदला अचानक घरातून बाहेर काढल्यामुळे नाराज झाले. तर अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, खानजादी यांना रडू कोसलले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Ajanta Ghat Road : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! अजिंठा लेणी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार; भूसंपादनासाठी राजपत्र होणार प्रसिद्ध, नव्या रस्त्याचा काय आहे प्लॅन?

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Jalgaon News : देवदर्शनाहून परतताना अपघात, क्रूझरमधील नाशिकच्या २ महिलांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Solapur Banana: केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ८०० कोटींचे नुकसान; पंढरपूर तालुक्यातील सुमारे ९०० एकरावरील केळीच्या बागा भुईसपाट

SCROLL FOR NEXT