Bigg Boss 17 Salman Khan hosting Munawar Faruqui esakal
मनोरंजन

Bigg Boss 17 : एक जोक काय सांगितला थेट जेलमध्येच गेला, कोण आहे मुनव्वर फारुखी? बिग बॉसमध्ये इंट्री!

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडचा भाईजान सलमान खान या शो चे होस्टिंग करत आहे. यंदाच्या पर्वाची विशेष उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

युगंधर ताजणे

Bigg Boss 17 Salman Khan hosting Munawar Faruqui : टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. आता या शो चा १७ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडचा भाईजान सलमान खान या शो चे होस्टिंग करत आहे. यंदाच्या पर्वाची विशेष उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

बिग बॉसच्या घरात येणाऱ्या प्रत्येक नव्या सदस्याविषयी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. तो सदस्य कोण आहे, त्याचे वैशिष्ट्य काय, त्याच्याभोवती असलेली कॉन्ट्राव्हर्सी याकडे नेहमीच वेगळ्या अँगलने पाहिले जाते. अशातच प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी चे नाव यंदाच्या सीझनसाठी समोर आले आहे. तो एक चर्चेतील सेलिब्रेटी आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

कंगनाच्या लॉक अप या रियॅलिटी शो मध्ये देखील मुनव्वर फारुखीनं सहभाग घेतला होता. त्यानंतर आता तो बिग बॉसमध्ये येणार असल्यानं त्याच्या चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. या सगळ्यात मुनव्वर फारुखी कोण आहे याचा सोशल मीडियावर शोध घेतला जात आहे. मुनव्वर हा नेहमीच त्याच्या परखड बोलण्यामुळे आणि त्याच्या स्टँडअपच्या सादरीकरणामुळे वादाचे कारण ठरला आहे.

सोशल मीडियावर सलमान खान आणि मुनव्वर फारुखी यांचे फोटो चर्चेचा विषय आहे. त्यावर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. यंदाचा सीझन भलताच रंगतदार होणार असल्याची शक्यता नेटकऱ्यांनी वर्तवली आहे. कंगनाच्या त्या शो पासून मुनव्वरची क्रेझ वाढत चालल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्याला अनेक शो साठी निमंत्रणंही आली होती. तो त्या शो चा विजेताही होता.

काही दिवसांपूर्वी त्याचे नाव चर्चेत आले होते. त्याचे कारण त्यानं एका धर्माच्या देवतांबद्दल केलेलं ते वक्तव्य. याशिवाय त्यानं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे तो वादाचे कारण झाला. यामुळे त्याला जेलमध्ये देखील जावे लागले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याची सुटका करण्यात आली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर मुनव्वरचे १२ शो रद्द करण्यात आले होते.

जेलची हवा खाल्ल्यानंतर मुनव्वरनं आपण यापुढे कॉमेडी करणार नसल्याचे सांगितले होते. यामुळे त्याचे चाहतेही नाराज झाले होते. मात्र आता तो बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये दिसणार असल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT