Bigg Boss 17 Vicky Jain try to slap wife Ankita Lokhande video viral  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात तुफान राडा! विकीनं उचलला अंकितावर हात! नेटकऱ्यांचा संताप

विकी जैनच्या या वागण्यावरून सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहे.

Vaishali Patil

Vicky Jain try to slap wife Ankita Lokhande: सलमान खान होस्ट करत असलेला सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात दररोज धक्कादायक ट्विस्ट येत आहेत. या शोमध्ये सध्या स्पर्धकांमध्ये तुफान भांडण पाहायला मिळत आहे.

एकीकडे मन्नारा आणि मुनव्वरमध्ये वाद झाला तर दुसरीकडे अंकिता आणि विकीचे नाते काही ठिक नसल्याचे दिसत आहे. रोजच अंकिता आणि विकीचे भांडण होत आहे. नुकताच दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की घटस्फोटापर्यंत विषय गेला.

अलीकडेच घरामध्ये स्पर्धकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये विकीने भांडणादरम्यान अंकितावर हात उचलला.

त्याच झालं असे की अभिषेक आणि विकी जैन यांच्यात काही गोष्टीवरून वाद सुरू होता, तर त्याच्या शेजारी बेडवर बसलेली अंकिता त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत होती.

अंकितामुळे विकी आणि अभिषेक यांना बोलता येत नव्हत आणि विकी अंकिताला वारंवार गप्प बसायला सांगत होता. तो तिला शांत राहण्यास सांगतो. मात्र तरीही अंकिता बोलत असताना विकी आपला संयम गमावून बसतो आणि काहीही विचार न करता अंकितावर हात उगारतो.

विकीच्या वागण्यामुळे अंकिताही शॉक बसतो. यानंतर, विकी रागाने बेडवरून उठतो आणि अभिषेकला दुसऱ्या बाजूला येण्यास सांगतो. त्याचवेळी विक्की जैनचे असे वागणे पाहून अरुणही थक्क होतो आणि म्हणतो - 'अरे देवा, हे काय बघायला मिळालं...'

सध्या या एपिसोडचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विकी जैनच्या या वागण्यावरून सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहे. विकीला प्रचंड ट्रोल केले.

एकाने लिहिले, "विकी जैनने अंकिताला मारण्याचा प्रयत्न केला. अरुण आणि अभिषेक बरोबर होते." तर दुसऱ्याने लिहिले,"हे घृणास्पद आहे. विकीने अंकिताला मारण्याचा प्रयत्न केला. निर्लज्ज. सध्या सोशल मिडियावर अंकिता आणि विकीची चर्चा आहे.

आता विकेंड का वारमध्ये सलमान खान यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT