Ayesha Khan Bigg Boss 17  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: आयशा खानवर कोसळली 'विकेंड का वार'ची विज! शोमधून होणार पत्ता कट?

आयशा खानने नुकतीच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली.

Vaishali Patil

Ayesha Khan Bigg Boss 17: बिग बॉस 17 हा टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. पण या शोमध्ये वादही तितकेच होताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी मुनव्वर आणि मन्नारा याच्यात तुफान राडा झाला तर त्यानंतर आयेशाची घरात एंट्री झाली. त्यानंतर घरातील सर्व वातावरणच बदललं.

आयशा खानने नुकतीच घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. ती मुनव्वर फारुकीमुळे चर्चेत आली आहे. आयशाने मुनव्वरवर अनेक गंभीर आरोप केले होते.

घरात आल्यापासूनच तिने घरात राडे करण्यास सुरुवात केली आणि आता लवकरच आयशा खानचा घरातून पत्ता कट होणार असल्याचे चित्र दिसत आहेत. आयशा आता बिग बॉसचा शो अर्थवट सोडून जाणार आहे.

तर त्यातच बिग बॉस 17चा या आठवड्याचा वीकेंड का वार चांगलाच गाजणार आहे. त्यात विकेंड का वारमध्ये सलमान खान आयशावर भडकला. त्याने तिला खुप फटकारले.

सलमान खानने आयशाला बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश करण्यामागील तिच्या मुळ हेतूबद्दल विचारले. त्यानंतर आयशा म्हणाली की, तिला मुनव्वर फारुकीकडून माफी हवी आहे. यावर सलमानने आयशाला विचारले की तिला राष्ट्रीय टेलिव्हिजनवर त्याच्याकडून माफी मागायची आहे का? यानंतर सलमान खान चांगलाच चिडला आणि म्हणाला की, 'तूझ्या वागण्यावरुन असं नाही वाटत की तू त्याच्यावर रागावली आहेस. '

तर यावेळी सलमान खानने मुनव्वरला देखील फटकारले. मुनव्वर सलमानला विचारतो की, जेव्हा तो त्याच्या शायरीतून खूप काही सांगू शकतो, तो आता गप्प का आहे?. तर दुसरीकडे तो आयशाला विचारतो की तूला जर माफीच मागायला लावायची होती तर तू जानेवारीपर्यंत का नाही थांबली. त्यासाठी थेट शोमध्येच आलीस.

तर सलमान खानने फटकरल्यानंतर आयशा खुपच रडली आणि त्याचा पुर्ण राग तिने मुनव्वरवर काढला. तर दुसरीकडे टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, आयशा खान लवकरच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार अशी चर्चा आहे. आयशाची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडत चालली आहे, त्यामुळे मेडिकल इमर्जन्सीमुळे तिला बिग बॉस 17 मधून बाहेर काढले जावू शकते. मात्र, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

SCROLL FOR NEXT